• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पं. स. कला अविष्कार कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न

by Ganesh Dhanawade
February 27, 2023
in Guhagar
65 1
0
Award distribution of Art Invention Program completed
128
SHARES
366
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भगवा झेंडा सर्वांनी मिळून उभा करण्याऐवजी राज्यात त्याची पळवापळवी सुरु आहे; आ. जाधव

गुहागर, ता. 27 : कला – क्रीडा सांस्कृतिक मंडळ पंचायत समिती गुहागर अंतर्गत विविध विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या व सहभागी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता श्री.पूजा हॉल पाटपन्हाळे येथे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गुहागरचे आम. भास्कर जाधव यांची लाभली. यावेळी या कलाविष्कार कार्यक्रमामधील स्वागत नृत्य पाहून ते भावून झाले. Award distribution of Art Invention Program completed

Award distribution of Art Invention Program completed

कला आविष्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समई नृत्य व जोतिबाचा नृत्य झाले. डोक्यावर समई घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने महिलांनी समई नृत्य केले. आम. भास्कर जाधव यांनी या नृत्याचा स्वत: व्हिडीओ केला. तर दुसरे स्वागत नृत्य जीवन शिक्षण शाळा यांनी केले. या स्वागत नृत्याचेही त्यांनी कौतुक केले. मात्र त्यांच्या हातामध्ये असलेल्या भगव्या झेंड्याबाबत आ. जाधव यांनी सल्ला दिला की, हातातील झेंडा जपून ठेवा, अन्यथा सध्या महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा सर्वांनी मिळून उभा करण्याऐवजी पळवापळवीचे षडयंत्र चालू आहे. असे ते म्हणाले. सदरहू कार्यक्रम तुम्ही सर्वांनी चांगल्याप्रकारे केलात तुमचे व तुमच्या टीमचे कॅप्टन, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांचे कौतुक केले. Award distribution of Art Invention Program completed

यावेळी आ. जाधव यांना शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत पत्रकारांनी विचारले असता, शिवसेनेच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल जे लढले त्यांनी जे कोर्टासमोर विधान केले ते महत्वाचे आहे. इथे उद्धव साहेबांची शिवसेना हरेल कि जिंकेल ? याचा विचार करून मी उभा राहिलो नाही. तर १९५० साली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी घटना दिली ती घटना टिकणार कि नाही ? त्या घटनेवर हा देश चालणार कि नाही ? त्या घटनेच्या आधारावर ही लोकशाही जिवंत आहे. कि ती जिवंत राहणार कि हा निर्णय उलटसुलट झाला त्याप्रमाणे लोकशाही संपणार? ती संपू नये यासाठी १९५० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली ती जिवंत राहावी यासाठी मी लढतोय. याचा अर्थ कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे सांगितले, निवडणूक आयोग अथवा कोर्ट असुदे एखाद्या पक्षाने नियोजितपणे जशी स्क्रिप्ट लिहून द्यावी. असे निर्णय द्यायला लागतील. तर या देशामध्ये घटनाच टीकणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय ? यापेक्षा जो चुकीचा निर्णय लागत चालला आहे त्यामुळे देशाचे भवितव्य अडचणीत येत आहे. Award distribution of Art Invention Program completed

Award distribution of Art Invention Program completed

आगामी नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आम्ही महाविकास आघाडीतर्फे एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवोशी येथील पाच वाड्या म्हणजेच संपूर्ण गाव शिंदे गटात गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र तेथील लोक मला गुहागरच्या माझ्या पक्ष कार्यालयात येवून भेटले. तात्पुरते कुणाचे मानसिक समाधान होत असेल तर मी त्यांचे समाधान का हिरावून घेऊ. निवोशी गाव हे माझ्या बरोबर आहे. असेही ते म्हणाले. Award distribution of Art Invention Program completed

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Award distribution of Art Invention Program completedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.