• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अवेरे

by Mayuresh Patnakar
May 16, 2023
in Guhagar
69 0
0
Avere President of Industrial Co-operative Society
135
SHARES
385
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड

गुहागर, ता. 16 :  शृंगारतळी येथे महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक  बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित ही संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्ष पदी ॲड. सुशिलजी अवेरे व उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आली. Avere President of Industrial Co-operative Society 

या संस्थेची संचालक निवड मागील महिन्यामध्ये पार पडली. या निवडणुकीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष विजय चंद्रकांत लांजेकर व त्यांच्या पत्नी सौ. विभावरी विजय लांजेकर, मंगेश रामदास कोंडविलकर, प्रफुल्ल सुधीर विखारे, सत्यवान दत्ताराम नांदलस्कर, अमीत अनंत अवेरे, किरण गोपाळ अवेरे, मयूर बाळकृष्ण कानसे, संतोष बाळू आग्रे, सौ. शलाका चंद्रकांत काष्टे आणि ॲड. सुशिल अवेरे हे संचालक म्हणून निवडून आले होते. सोमवारी दिनांक १५.०५.२०२३ रोजी सर्व संचालाकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक पार पडली. त्यामध्ये एकमताने उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची तर ॲड. सुशिलजी अवेरे यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातून सर्व संचालाकांचे अभिनंदन केले जात आहे. Avere President of Industrial Co-operative Society

यावेळी संस्थेचे सचिव अमित नंदकुमार इंदुलकर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एकनाथ सुरेश साळुंखे साहेब यांनी काम पाहिले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन, गुहागर तालुक्यातील अनेक क्षेत्रातील मान्यवर व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष ॲड. सुशिलजी अवेरे यांनी सांगितले. Avere President of Industrial Co-operative Society

Tags: Avere President of Industrial Co-operative SocietyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.