• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अतुल फडके यांचे अकाली निधन

by Mayuresh Patnakar
July 11, 2023
in Guhagar
1.1k 12
0
Atul Phadke is No More
2.2k
SHARES
6.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : शहरातील वरचापाट येथील उद्योजक अतुल फडके (वय 52) आपल्या मित्रांसमवेत वाई येथे फिरायला गेले होते.  तेथेच  हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 8 जूनला सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. अतुल फडके यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले आहेत. त्याच्या अकाली जाण्याने गुहागर शहरवासीयांना धक्का बसला आहे. Atul Phadke is No More

गुहागर वरचापाट येथील दुर्गादेवी देवस्थानचे ट्रस्टी अतुल फडके शनिवारी सकाळी आपल्या 13 मित्रांसोबत वाई येथे पर्यटनासाठी गेले होते. दिवसभरात चाफळ, लिंब येथील 12 मोटांची विहीर आदी पर्यटनस्थळे पाहून हे मित्र सायंकाळी 5 च्या सुमारास वाईपासून सुमारे 8 कि.मी दूर एका फार्म हाऊसवर गेले. त्या फार्म हाऊसच्या परिसरात पोहोण्याचा तलाव पाहून सर्वांनी पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मित्रासमवेत अतुल फडकेही पाण्यात उतरले. मात्र अस्वस्थ वाटु लागल्याने पाण्यातून बाहेर पडून कपडे बदलण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अतुल दिसत नाही म्हणून एक मित्र कपड बदलण्याच्या खोलीत गेला तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. तातडीने मित्रांनी अतुल फडके यांना ग्रामीण रुग्णालय वाई येथे नेले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अतुलचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या संदर्भात मनिष खरे व मयूरेश पाटणकर यांनी वाई पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीसांनी अतुल फडके यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. रात्री वाई येथेच शवविच्छेदन केल्यानंतर अतुल फडके यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या. रविवारी सकाळी 9 वा. गुहागरच्या स्मशानभुमीत अतुल फडके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Atul Phadke is No More

खरतरं कोरोनाच्या महामारीनंतर आपल्याच एका जीवलग मित्राच्या निधनाची बातमी लिहावी लागेल असे स्वप्नात वाटेल नव्हते. गेले दोन दिवस काही लिहिण्याचा धीरही होत नव्हता. परंतु पत्रकारीतेचा धर्म म्हणून आज हा लेख लिहित आहे. – मयूरेश पाटणकर  व मनोज बावधनकर Atul Phadke is No More

Tags: Atul Phadke is No MoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share893SendTweet558
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.