• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

by Guhagar News
May 20, 2025
in Maharashtra
115 1
0
Astronomer Jayant Narlikar is No More
225
SHARES
644
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. Astronomer Jayant Narlikar is No More

आंतररष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता, असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 2021मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते. जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. Astronomer Jayant Narlikar is No More

पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला केले. त्याकाळी जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले होते. फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते. जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल यांचा समावेश व्हायचा. त्याकाळात हॉईन-नारळीकर ही थिअरी त्याकाळी प्रसिद्ध झाली होती. जगाची निर्मिती स्फोटातून झाली, या थिअरीचे दोघेही टीकाकार होते. जयंत नारळीकर यांना 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर यांनी टीआयएफआरमध्ये दाखल झाले. भारताचं आजचं खगोलशास्त्राचं जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये जयंत नारळीकर यांनी पाया रचला होता. ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. Astronomer Jayant Narlikar is No More

त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे, अशी प्रतिक्रिया खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केली. डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली. Astronomer Jayant Narlikar is No More

Tags: Astronomer Jayant Narlikar is No MoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.