कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग
न्यूयाँर्क, ता. 16 : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले. Astronaut Shubanshu Shukla returns to Earth

शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले. तसेच, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (ISS) पोहोचणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांनी अवकाश स्थानकात सतरा दिवस वास्तव्य केले. या काळात शुभांशु शुक्ला यांनी साठपेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यात भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. त्यांनी हाडांच्या आरोग्याविषयी अभ्यास केला. 28 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला आणि तिरुअनंतपुरम, बंगळूरू, लखनऊ येथील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 6 जुलैला इस्रोमधील शास्त्रज्ञांशी गगनयान मोहिमेविषयी चर्चा केली. शुभांशु शुक्ला यांनी आयएसएसच्या क्युपोला मॉड्यूलमधून पृथ्वीची अद्भुत फोटोग्राफीही केली. Astronaut Shubanshu Shukla returns to Earth

शुभांशु यांची ही मोहीम आगामी गगनयान मोहिमेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या मोहिमेमुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला नवी उंची मिळाली आहे. शुभांशू शुक्ला 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात गेले होते. ते अमेरिका, पोलंड आणि हंगेरीमधील तीन सहकारी अंतराळवीरांसोबत 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाले. अखेरीस, हे सर्व अंतराळवीर 15 जुलै रोजी पृथ्वीवर पोहोचले. Astronaut Shubanshu Shukla returns to Earth

दरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारं यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे १० दिवस क्वारेंटाईनमध्ये ठेवलं जाईल. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतर शुभांशू शुक्ला भारतात परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. Astronaut Shubanshu Shukla returns to Earth