अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे
रत्नागिरी,ता. 26 : शहरामध्ये दामले पॅटर्न यशस्वीपणे प्रस्थापित करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १५ म्हणजेच दामले विद्यालयाला ( Damle Vidyalaya ) अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाने दहा हजार रुपयांचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. Assistance to Damle Vidyalaya

दामले विद्यालय नगरपरिषदेच्या शाळांमध्ये नेहमीच अव्वल असते. आणि यंदाच्या वर्षी विक्रमी पटसंख्या पटकावणाऱ्या विद्यालयास शैक्षणिक उठावाअंतर्गत गरजेची वस्तू अथवा शालेय साहित्य, विद्यार्थ्यांसाठी साधने, खरेदी करण्यासाठी चित्पावन मंडळाने ही मदत देऊ केली आहे. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी चित्पावन मंडळाचे विशेष आभार मानले. Assistance to Damle Vidyalaya

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दामले विद्यालयाचा (Damle Vidyalaya) चेहरा मोहरा गेल्या पाच वर्षांत बदलून गेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, बीडीएस परीक्षांसह अनेक परीक्षांमध्ये या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. शिक्षकांनी सुसंस्कारित विद्यार्थ्यांची पिढी घडवली पाहिजे. याकरिता शाळेतील सर्व शिक्षक योगदान देत असल्याबद्दल चित्पावन मंडळानेही या शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी शिक्षिका सौ. मंजिरी लिमये, जुलेखा काझी, योगेश कदम यांच्यासह चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सदस्य अनंत आगाशे, मोहन पटवर्धन आदी उपस्थित होते. Assistance to Damle Vidyalaya