बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीनंतर प्रशासन हलले
गुहागर, ता. 30 : शहरातील विजापूर महामार्गाच्या प्रारंभ बिंदुपासून भुसंपादन प्रक्रियेतील मुल्यांकन सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. या सर्वेक्षणामुळे बाधितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम निश्चित होणार आहे. आठवडाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुहागर विजापूर महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत मंत्रालयात बैठक घेतली होती. त्यामुळेच प्रलंबित संपादन प्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आहे. Assessment begins in Guhagar
फेब्रुवारी 2019 मध्ये गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला देवघर (ता. गुहागर) येथून सुरवात झाली. पहिल्या टप्प्यातील भुसंपादनातील जागा मालकांना नुकसानभरपाई पोटी द्यावयाची रक्कम उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेली चार वर्ष पडून आहे. मात्र प्रारंभ बिंदू पासून अनेक ठिकाणचे भुसंपादनाची प्रक्रियाच पूर्णत: राबविण्यात आली नव्हती. त्यामुळे गुहागर शहरातील कामाला ठेकेदाराने गेल्या चार वर्षात हात लावला नव्हता. Assessment begins in Guhagar
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुहागर विजापूर महामार्गाच्या अपूर्ण कामांबद्दल बुधवार 23 ऑगस्टला मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला महामार्गाशी संबंधित सर्व अधिकारी तसेच गुहागरमधील नागरिक उपस्थित होते. याच बैठकीत भुसंपादनाशी संबंधित सर्व प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या होत्या. या बैठकीनंतर गुहागर विजापूर महामार्गाच्या भुसंपादनाच्या कामाला सुरवात झाली आहे. मार्च 2023 मध्ये कोणाची किती जमीन जाणार याचा नकाशा प्रांताधिकारी कार्यालयाने तयार केला होता. आता प्रत्यक्षात जागेवर जावून अधिकारी सर्वेक्षण करत आहेत. जागेची, इमारतींची मापे घेत आहेत. त्यानंतर प्रत्येक जागामालकाच्या जागेचे, इमारतीचे मुल्यांकन होवून शासनाच्या सुत्राप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम देण्यात येणार आहे. Assessment begins in Guhagar
मोबदल्याचे सूत्र असे असेल
ज्यांची बांधकामे अतिक्रमण स्वरुपातील आहेत त्यांना कोणताही मोबदला मिळणार नाही. आज काही जागा मालकांच्या कोर्ट केस सुरु आहेत त्यांच्या मोबदल्याचा विषय केसच्या निकालानंतर होईल. उर्वरित जागेमध्ये असलेल्य. बांधकामाचा विचार करुन महामार्गाने ठरवून दिलेल्या सुत्राप्रमाणे दर निश्चित करुन रक्कम जागा मालकांच्या खात्यात जमा होईल. पुढील 15 दिवसांत दर काय असेल त्याची माहिती मिळेल. Assessment begins in Guhagar