रत्नागिरी, ता. 18 : निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी लागू केले आहेत. Assembly voting
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/10/adv-2-701x1024.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/10/adv-2-701x1024.jpg)
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यात दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक आवश्यक असल्याची खात्री झाल्याने सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत. Assembly voting