संदेश मोहिते
गुहागर, ता. 05 : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 4 नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. बंडखोरानी माघार घ्यावी, यासाठी सर्वच पक्षाचे नेत्यांचे रविवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते. गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे संदेश मोहिते, अपक्ष संतोष जैतापकर बंडखोर माघार घेतात का, याकडे आता सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. Assembly Elections
कोकणातील आरपीआय पक्षाचे एकमेव उमेदवार श्री.मोहिते यांची गुहागर विधानसभेतून माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.रामदास आठवले व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत फोनवर संपर्क झाला. यात श्री.मोहिते यांनी सांगितले की, रिपाई पक्ष महायुतीमध्ये समाविष्ट आहे. तरी कोणत्याही प्रकारे या पक्षाचा विचार केला जात नाही. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघातून रिपाई पक्षाचे स्वर्गीय दयानंद मोहिते यांचे सुपुत्र संदेश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रिपाई (आठवले) पक्षाकडून मागे घेण्यासंदर्भात खालील मागण्या आपल्याकडून पूर्ण करावीत. Assembly Elections
यामध्ये फुले शाहू आंबेडकर मतदारांसाठी “विकास” करण्यात यावा, रामदास आठवले यांना “कॅबिनेट मंत्रीपद”देण्यात यावे, संदेश मोहिते यांना “विधानपरिषद”कोकणातून देण्यात यावी, रिपाई (आठवले) पक्षाला 3 महामंडळ “अध्यक्षपदी” नियुक्त करण्यात यावी, रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यात ‘एक जिल्हा परिषद’ उमेदवारी देण्यात यावी, “महायुती” सत्ता आल्यास जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये समाज कल्याण सभापती पद रिपाई (आठवले)पक्षाला मिळावे, कोकणातील प्रत्येक तालुक्यात “3 पंचायत समिती” मध्ये रिपाई आठवले पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे, रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन कमिटी मध्ये “2 प्रतिनिधी” नियुक्त करावे, महायुती सरकारच्या “शासकीय व निमशासकीय कमिटी” मध्ये “3 प्रतिनिधी असावेत, महायुती सरकारच्या विकास कामाचा व असंख्य योजनेच्या जनसामान्यापर्यंत नेण्यासाठी पदाधिकाऱ्याची “सदस्य पदी” नियुक्ती करावी, विकास कामात 10 टक्के “सन्मान वाटा”देण्यात यावा तसेच शासन करता जमात करण्याचं संपूर्ण समर्थन महायुती सरकारकडून व्हाव्या. अशा विविध मागण्या श्री. मोहिते यांनी केल्या असून या सर्व मागण्या मान्य केल्या असून याबाबतचे लेखी स्वरूपात आश्वासन लवकरच देण्यात येईल, असेही या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे. Assembly Elections