गुहागर, ता. 16 : गुहागरची जागा भाजपला सुटली तर आम्ही काम करणार असून आम्हाला सुटली तर भाजप युती धर्म पाळेल ही अपेक्षा आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते रामदास कदम यांनी माध्यमंसोबत बोलताना केले.श्री. कदम यांनी पत्रकारांसोबत बोलताना दापोली मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. Assembly Elections
ते म्हणाले, दापोली मतदारसंघाबाबत माझी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे त्यांनी सर्व काही सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे समझनेवाले को इशारा काफी है’ तरी सुद्धा आम्ही पुन्हा एकत्र बसून चर्चा करणार आहोत. सन २००९ मध्ये मी गुहागर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. Assembly Elections
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी बीड भागातील एक जागा युतीमध्ये भाजपला घेऊन गुहागरची जागा शिवसेनेला सोडली होती. त्यामुळे यावेळी युतीच्या चर्चेत जर जागा भाजपला सुटली तर आम्ही त्यांचे काम करू परंतु जर ती जागा आम्हाला सुटली तर भाजपने युती धर्म पाळेल अशी अपेक्षा. रामदास कदम यांनी व्यक्त केली. Assembly Elections