• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण कामाला सुरुवात

by Manoj Bavdhankar
May 20, 2026
in Guhagar
274 3
0
Asphalting of the Main Road in Guhagar Market
538
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 नगरसेविका अनुषा  शार्दुल भावे यांच्या प्रयत्नांना यश

गुहागर, ता. 20 : बाजारपेठ नाका ते पोलीस स्टेशन या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली होती. हा रस्ता खड्डेमय तसेच धुळीचे साम्राज्य झाले होते. वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागत होता अखेर या रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून यासाठी वार्ड क्रमांक ६ मधील नगरसेविका अनुषा  शार्दुल भावे व बाजारपेठ मधील रहिवासी यांना रस्ता डांबरीकरणाच्या प्रयत्नांना  यश आले. Asphalting of the Main Road in Guhagar Market

Asphalting of the Main Road in Guhagar Market

पर्यटनामुळे गुहागर बाजारपेठेतील मुख्य रस्ता हा शहराची आर्थिक आणि सामाजिक जीवनवाहिनी आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्याचे मागील १० ते १५ वर्षांपासून डांबरीकरण करण्यात झालेले नाही. प्रदीर्घ काळ दुरुस्ती न झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली होती.  जागोजागी

पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेळोवेळी दुरुस्तीचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आले होते.  या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी व आवश्यक निधी प्राप्त होत नव्हता. रस्ता खराब असल्यामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते, तर उन्हाळ्यात धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, ज्याचा थेट परिणाम पर्यटनावर होत होता. Asphalting of the Main Road in Guhagar Market

Asphalting of the Main Road in Guhagar Market

गुहागर नगरपंचायत अनेक वेळा ग्रामस्थांच्या मागणीनुसार या रस्त्यावर पाणी मारत होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यापैकी बाजारपेठेतील खराब १५० मीटर लांबीच्या दुरूस्तीचे नियोजन होते. त्यातील केवळ ८० मीटर भागात पेवर ब्लॉक बसवण्याचा निर्णय झाला होता. या कामाला ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन हा रोड डांबरीकरणच व्हावा अशी मागणी केली होती. यासाठी नगरसेविका अनुषा  शार्दुल भावे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ग्रामस्थांचं आंदोलनाचा इशाराही दिला होता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री  व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू  यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीनुसार अखेर आज हे काम पूर्णत्वास आले. Asphalting of the Main Road in Guhagar Market

Tags: Asphalting of the Main Road in Guhagar MarketGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share215SendTweet135
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.