डॉ. विनय नातू यांनी केले जुन्या सहकाऱ्याचे उत्साहात स्वागत
गुहागर, ता. 02 : भारतीय जनता पार्टीचे जुने नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पारदळे १२ वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील झाले आहेत. पेवे गावचे सरपंच, पेवे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य अशी विविध पदे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भूषविलेली होती. काही तात्विक कारणांमुळे २०१२ सालात त्यांनी आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र १२ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा अशोक पारदळे भाजपवासी झाले आहेत. Ashok Pardale again in BJP
आपल्या या जुन्या जाणत्या व विश्वासू सहकाऱ्याचे गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी उत्साहात स्वागत केले. पारदळे यांच्या पुर्नप्रवेशाच्या वेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, पारदळे यांचे जुने सहकारी गुहागर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती बावाशेठ भालेकर, आरे माजी सरपंच श्रीकांत महाजन, कारुळ माजी सरपंच मंगेश जोशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश चौगुले, आरे माजी उपसरपंच साईनाथ कळझुणक,भाजपाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हिदायत भाई मुखरी, सरचिटणीस सचिन ओक, अंकुश पिलवलकर, गुरुनाथ कारेकर आदींसह बहुसंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. Ashok Pardale again in BJP
यावेळी भारतीय जनता पार्टीचे गतवैभव या गुहागर विधानसभेमध्ये पुन्हा उभे करण्यासाठी, नातूसाहेबांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी मी कटिबद्ध असून मी माझ्या जिल्हा परिषद गटा पुरताच नव्हे तर संपूर्ण गुहागर तालुका पिंजुन काढणार असून शतप्रतिशत भाजपासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अशोक पारदळे यांनी सांगितले आहे. पारदळे यांच्या पुर्नप्रवेशामुळे गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या पुढील कालखंडात निवडणुकांपर्यंत अनेक जुने जाणते विश्वासू सहकारी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होणार असुन जुन्या जाणत्या सहकाऱ्यांबरोबरच विरोधी गटातील अनेक नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले. Ashok Pardale again in BJP