• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 August 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबईकरांच्या गाड्या अडकल्याने नेत्यांची पळापळ

by Guhagar News
November 20, 2024
in Politics
729 8
0
As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away
1.4k
SHARES
4.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सायंकाळी गाड्या गावात पोचणार, मतदानाचा टक्का वाढणार का?

गुहागर, ता. 20 : कोकणातील मतदानाचा टक्का मुंबई पुण्यातून चाकरमानी गावात आला तर वाढतो. आज मतदानासाठी गुहागर तालुक्यात सुमारे दिडशे वाहने येणे अपेक्षित होते. मात्र वेगवेगळ्या कारणाने यापैकी निम्मी वाहने विरार नालासोपारामधुन बाहेर पडलीच नाहीत. तर उर्वरीत वाहने मतदारांना घेवून मुंबई बाहेर पडण्यास विलंब झाला. शेवटी बस रात्री 4 वा. मुंबईतून सुटली. मात्र महामार्गावरील खोळंब्यामुळे ही वाहने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी यावीत यासाठी कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

कोकणातील विशेषत: रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व निवडणुकांच्या व्यवस्थापनात वहातूक व्यवस्था हा सर्वांत प्रभावी आणि कळीचा मुद्दा असतो. गावात नोंद असलेले बहुतांश ग्रामस्थ आता कुटुंबकबिल्यासह मुंबई, पुणे यासारख्या शहरात रहाण्यास गेले आहेत. एरव्ही सणावाराला, रेशन न्यायला मुंबईकर स्वखर्चाने येतात. पण मतदानाचा दिवस म्हणजे नेत्याने, उमेदवाराने वाहनाची व्यवस्था, प्रवासातील चहा नाष्ट्याची व्यवस्था करणे हे त्याचे आद्यकर्तव्य मानले जाते. कारण ते मतदानासाठी गावात आले तर मतदानाची टक्केवारी वाढते. शिवाय त्या त्या उमेदवाराच्या मतांमध्ये वाढ होते. म्हणूनच कोणत्याही निवडणुकीत प्रत्येक बुथवर स्थानिक मतदार, बाहेरगावी असलेले मतदार यांची संख्या एकत्र केली जाते. मतदाराचे मोबाईल क्रमांक संकलीत केले जातात. पंचायत समिती गणनिहाय कोणकोणत्या ठिकाणाहून मतदारांना आणण्यासाठी वाहन व्यवस्था आवश्यक आहे त्याचे नियोजन केले जाते. As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

यावर्षी देखील अशापध्दतीचे नियोजन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव, महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांनी केले होते. मात्र एकाच दिवशी राज्यात सर्व ठिकाणी मतदान होत असल्याने अपेक्षित संख्येत वाहनांची उपलब्धता होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींवर मात करण्यासाठी वाहन भाड्यापेक्षा अधिकची रक्कम देवून गुजराथमधून ट्रव्हल्स, मुंबईतील स्कूलबस निश्चित कमी आसन क्षमतेचे टेम्पो ट्रव्हलर्स आरक्षित करण्यात आले होते. As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

गुहागर तालुक्यातील मोठी संख्या वसई, विरार, नालासोपारा या भागात रहाते. त्यामुळे या भागातून सुटणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक 90 होती. मंगळवारी (ता. 19)  सायंकाळी विरारमधील राजकीय कार्यकर्त्याच्या लक्षात आले की बहुसंख्य मतदार कोकणात मतदानाला जात आहेत. तसे झाले तर येथील मतदानावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी वाहने उभी असलेल्या मैदानातून एकही गाडी बाहेर पडणार नाही अशी व्यवस्था केली. त्याचप्रमाणे स्कूलबसमधुन प्रवासी ने आण करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई करु. अशा सूचना स्कूलबसच्या मालकांपर्यंत पोचविण्यात आल्या. यामुळे गुहागरकडे निघणाऱ्या गाड्यांचे नियोजन कोसळले. गुहागर आणि मुंबईतील गावपुढारी, नेते, मंडळांचे कार्यकर्ते याची पळापळ सुरु झाली. काहीही करा पण वाहनाची व्यवस्था करा असे निरोप इथून मुंबईत पोचत होते. As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

सायंकाळी 7 ते 9 च्या दरम्यान मतदारांना घेवून या गाड्या विरारमधून रवाना होणे आवश्यक होते. नियोजनाप्रमाणे वाटेवाटेवर गुहागरचे मतदार गाड्यांची वाट पहात उभे होते. गाडी नक्की कधी सुटेल याची खात्री कोणीच देऊ शकत नव्हता. त्यातून सामाजिक माध्यमांवर (व्हॉटसॲप) आरोप प्रत्यारोप सुरु झाले. अशी व्यवस्था असेल तर आम्ही यायचे कशाला, रात्री 2 वाजले तरी गाडी आली नाही. आम्ही कितीवेळ वाट पहायची, गाड्यांचे मालक फोन उचलत नाहीत, गावात पोचायचे कधी आणि तिथून निघायचे कधी अशा विविध प्रश्र्नांचा भडीमार रात्री 3 वाजेपर्यंत चाकरमान्यांकडून येथील पदाधिकाऱ्यांवर सुरु होता. As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीप्रमाणे गुहागर तालुक्यात येणाऱ्या निम्म्या गाड्या रद्द झाल्या. सुमारे 50 ते 60 गाड्या मतदारांना घेवून रात्री उशिरा गुहागरकडे रवाना झाल्या. शेवटची गाडी मुंबईतून मंगळवारी रात्री 4 वाजता निघाली. मात्र महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांची होणारी तपासणी आणि वहातूक कोंडी यामुळे या गाड्या गावात मतदानाची वेळ संपण्यापूर्वी पोचतात का याची वाट गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी पहात आहेत. जर या सर्व गाड्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात पोचल्या तर शेवटच्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी देखील वाढणार आहे. मात्र मतदार वेळेत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. As the cars of Mumbaikars got stuck, the leaders ran away

Tags: As the cars of Mumbaikars got stuckAs the cars of Mumbaikars got stuck the leaders ran awayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in Guhagarthe leaders ran awayUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share573SendTweet358
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.