संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या डेरवण येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी शाळेचा विद्यार्थी आर्यन संतोष माटल याने थाळीफेक मोठ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुयश संपादन केले. स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आर्यनची विजयी मिरवणूक काढण्यात आली व भव्य सत्कार करण्यात आला. Aryan Matal success in sports competition
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या क्रीडा महोत्सवात चिपळूण पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन आर्यनचा गौरव करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल पंचायत समिती गुहागरच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती लीना भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी रायचंद गळवे, अशोक गावणकर , केंद्रप्रमुख विश्वास खर्डे, परवेज चिपळूणकर, तुकाराम निवाते,ग्रामपंचायत कुडलीच्या सरपंच चैतनी शेट्ये, उपसरपंच संतोष पावरी, सर्व सदस्य, ग्रामसेवक हरीश कुळये तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश वनये, पांडुरंग थोरसे, शांताराम थोरसे, विजय घडशी, दिनेश माटल, मुकेश थोरसे, किसन माटल, किसन थोरसे, विष्णू थोरसे, सर्व विद्यार्थी, माटलवाडी युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. आर्यनच्या या यशासाठी मुख्याध्यापक सुहास गायकवाड, शिक्षक प्रमोदिनी गायकवाड, संदेश सावंत, गणेश वायचाळ, अंकुर मोहिते, संदीप खंडगावकर, दिपक कुणघाडकर, सौरभ कटनाक यांनी मेहनत घेतली. Aryan Matal success in sports competition