गुहागर, ता. 09 : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ – २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत गुहागर हायस्कूलची आर्या मंदार गोयथळे इ. – नववी या विद्यार्थिनीने इयत्ता आठवी ते दहावीच्या गटामध्ये गुहागर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. Arya Goyathale second in Pragyashod exam
ही परीक्षा ७ डिसेंबर २०२४ रोजी ८ वी ते १० गटात गुहागर हायस्कूलमध्ये घेण्यात आली होती. ही परीक्षा स्कॉलरशिप धरतीवर घेण्यात येत असून परीक्षेला एकूण ४५ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचे प्रमुख म्हणून स्वामिनी भोसले यांनी काम पाहिले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये गुहागर हायस्कूलची आर्या मंदार गोयथळे हीने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. Arya Goyathale second in Pragyashod exam


यावेळी शिक्षक गायत्री कनगुटकर, स्वामिनी भोसले, मीनल खानविलकर, सुधाकर कांबळे, ज्योती देवकर, उप मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, पर्यवेक्षक मधुकर गंगावणे, कृपाल परचुरे, व्ही. टी. जाधव, अविनाश गमरे, गुलाबसिंग पाटील, विलास साबळे, अमोल कतकर उपस्थित होते. आर्या गोयथळे हीच्या यशाबद्दल गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. Arya Goyathale second in Pragyashod exam