५ ते ११ जानेवारी पर्यंत प्रदर्शन पाहता येणार
रत्नागिरी, ता. 03 : येथील केजीएन सरस्वती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रत्युष चौधरी आणि युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या टीआरपी येथील मित्र संकुल येथील प्रद्योत आर्ट गॅलरीत ५ ते ११ जानेवारीपर्यंत आयोजित केले आहे. कलारसिकांनी या प्रदर्शनाला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भेट द्यावी, असे आवाहन प्रद्योत आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आले आहे. Artifact Exhibition at Ratnagiri
या गॅलरीची क्युरेटर म्हणून युवा चित्रकार मयुरी घाणेकर-भाटकर काम पाहत आहे. सिद्धांत चव्हाण हा या गॅलरीचा चित्रकार म्हणून सध्या काम करत आहे. सिद्धांत याचे कलाशिक्षण देवरुख कला महाविद्यालयामध्ये झाले. त्याने बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी प्राप्त केली आहे. सिद्धांतने यापूर्वी रत्नागिरी आणि मुंबई येथील कला प्रदर्शनात ग्रुप शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याने डिसेंबर २०२३ रोजी आर्ट प्लाझा प्रदर्शन केले होते. मे २०२४ मध्ये प्रद्योत आर्ट गॅलरीमध्ये सिद्धांतने प्रदर्शन भरवले आणि डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईमधील आर्ट एनट्रान्स गॅलरी मध्ये ‘आकृतीबंध’ ग्रुप शोमध्ये सहभागी होता. डॉ. चौधरी यांनी २०२४ मध्ये प्रद्योत आर्ट गॅरीमध्ये ग्रुप शोमध्ये सहभाग दर्शवला होता. Artifact Exhibition at Ratnagiri
या प्रदर्शनामध्ये अब्स्ट्रॅक्टिव रिअलिझम या शैलीत मूर्त व अमूर्त या संकल्पनांचा मिलाप होतो. कलाकार आपल्या अमूर्त अशा जाणीव, भाव-भावना, विचार, संकल्पना यांना मूर्त आकारांच्या सहाय्याने रूपाकार देतो. अशा तऱ्हेच्या प्रयोगातून चित्रकलेला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. अशी कलाकृती प्रेक्षकांसाठी जणू प्रतिबिंबच बनून स्वतःमध्ये डोकावून पहायला प्रोत्साहन देते. Artifact Exhibition at Ratnagiri