लेखक – डॉ. रविंद्र खाडिलकर फोन नं. 9763784434
१६ व्या शतकात महाराष्ट्रातले एक नामवंत स्वामी रामदास स्वामी यांनी लिहीलेली ही ओळ आहे. नेहमी सर्व लोकांनी सदा सर्वकाळ मंगल (चांगले) बोलावे आणि सर्व लोकांनी सर्वांबद्दल चांगले बोलावे, असे आवाहन स्वामी करतात. Articals of Dr. Khadilkar
आजच या पंक्ती आठवण्याचे कारण गेले सुमारे तीन ते चार वर्ष महाराष्ट्रातील राजकारण, सत्तासंघर्ष त्यातून उत्पन्न झालेली स्थिती आणि त्यातील सर्व पक्षीय राजकारणी लोकांचे वक्तव्य ऐकल्यानंतर वरील ओळीची किती आवश्यकता आजच्या काळात आहे याची अधिकाधीक जाणीव सर्वसामान्य माणसाला झाल्याशिवाय राहणार नाही. Articals of Dr. Khadilkar
संसदिय लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचे मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे किंबहुना भारतीय संविधानिक घटनेने ते प्रत्येकाला दिलेले अबाधित स्वरुपाचे स्वातंत्र्यच आहे. घटनाकारांना प्रत्येक पक्षाला स्वत:च्या मत स्वातंत्र्यात मत अभिव्यक्त करण्यासाठी दिलेला अधिकार एका मर्यादित स्वरुपात वापरणे अभिप्रेत होते. स्वातंत्र्याचा अधिकार का स्वैराचार हा आता एक संशोधनाचाच विषय ठरला आहे. भारताच्या संसदिय लोकशाहीमधे फार पूर्वीपासून वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या विषयावर अतिशय टोकाची भूमिका घेतलेली आपणास दिसून येते. पूर्वी घेतलेली भूमिका काही राजकीय स्वार्थापोटी अथवा काळाच्या जबरदस्त रेट्यामुळे पूर्ण उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव बदललेली आपणास पहायला मिळते. या दोन विरोधी भूमिकांचं समर्थन करताना पक्षाची, पक्षाच्या प्रवक्त्यांची कार्यकर्त्याचीही तारांबळ झालेली आपणास दिसून येते. Articals of Dr. Khadilkar
काँग्रेस, जनसंघ म्हणजे भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी अशा वेगवेगळ्या वैचारीक मतांचे प्रदर्शन यापूर्वीही संसदिय लोकशाहीत आपणास पहायला मिळते. राजकारणामध्ये मतांच्या रेट्यामुळेच काही प्रादेशिक पक्ष ही निर्माण झालेले संसदिय लोकशाहीत दिसून येतात. यासर्व लोकांमधे असलेले वैचारीक मतभेद लोकशाहीत प्रकर्षाने दिसून येतात. किंबहुना सशक्त लोकशाहीचा तो एक पायाच आहे असे म्हणा ना. असे असले तरी ही भारतीय संसदिय लोकशाहीचा इतिहास पाहता आजपर्यंत प्रत्येक पक्षाने अतिशय संयमाने या वैचारीक वैविध्यतेचे दर्शन आपल्या कृतीतून आणि वाणीतून दाखवलेले दिसत होते. Articals of Dr. Khadilkar
लोकसभेचा विचार करताना पंडीत नेहरू, बॅरिस्टर नाथ पै, अटलबिहारी वायपेयी, मधु दंडवते यासारख्या विचारवंतांची असंख्य वेळेला वैचारीक हाणामारी झालेली आहे. या सर्व लोकांच्या लोकसभेतील भाषणात वेळोवेळी अत्यंत तीव्र संघर्ष झालेलासुद्धा आपणास पाहायला मिळतो, परंतु लोकसभेच्या बाहेर या सर्व लोकांची मैत्रीसुद्धा याच भारताने अनुभवलेली आहे. Articals of Dr. Khadilkar
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यासारखे दिग्गज नेते काँग्रेसमधे होऊन गेले. देवेंद्र फडणीवस, नारायण राणे, मनोहर जोशी यासारखे विविध पक्षाचे मुख्यमंत्रीसुद्धा महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले. समितीच्या आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाणांवर केलेली वैयक्तिक टीका ही इतकी विचीत्र होती की ती ऐकल्यानंतर यशवंतरावांनी अत्रेंना वैयक्तिरीत्या बोलावून घेतले आणि त्या टीकेचाउलगडा त्यांच्यासमोर केला. अत्रे हे सुद्धा असे रुबाबदार व्यक्तिमत्व होते की तो उलगडा ऐकल्यानंतर अक्षरश: यशवंतरावांचे पाय धरून माफी मागायची इतकेच शिल्लक होते. इतके ते ओशाळले. Articals of Dr. Khadilkar
लातूर जिल्ह्याची निर्मिती ही बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले या भारतीय मुसलमान मुख्यमंत्र्याने केली यात शंकाच नाही. पण कालांतराने अडगळीत गेलेल्या अंतुल्यांचा सत्कार लातूरच्या जाहीर सभेत दिलदार मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी केला हे महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन महाराष्ट्रात देखील राजकीय विरोधाभास असताना सुद्धा राजकाण्यांच्यात असलेला एकमेकांबद्दलचा स्नेहभाव, सद्भावना एकत्र मिळून काम करण्याची खिलाडूवृत्ती, एकमेकांच्या पक्षाबद्दल व नेत्यांबद्दल असलेला प्रेमभाव, आदरभाव हे सर्व दिवसेंदिवस खड्यात जात चालला आहे का ? असा विचारसुद्धा नागरीकांच्या मनात आल्याशिवाय राहात नाही. सायकलवरून लोकसभेत जाणारे खासदार मधु दंडवते आणि आजच्या काळातील साधे नगरसेवक याची तुलनाच होऊ शकत नाही. Articals of Dr. Khadilkar
वाणी हे परमेश्वराने मनुष्याला दिलेले एक ज्ञानेद्रिय आहे. त्याचा उपयोग अतिशय कुशलतेने करण्याची जबाबदारी सर्व पक्ष, प्रवक्ते आणि कार्यकर्ते यांच्यावर आहे. गडकरी एका नाटकात लिहितात, “वाणीचा बाण जिथून सुटतो तिथे काहीच नशिणी उरत नाही, पण जिथे लागतो; तेथे जखम होते आणि जखम जरी बरी झाली तरी व्रण हा कायम राहतो.” Articals of Dr. Khadilkar
आजच्या काळात रोज सकाळी उठल्यानंतर सर्व प्रवक्त्यांची टीव्हीवर, वर्तमानपत्रात, सोशल मिडीयावर भाषा ऐकल्यावर भारताचा सुजाण नागरीक म्हणून या सर्व लोकांना (मग त्यात डावे-उजवे, उभे-आडवे, त्रिकोणी, चौकोनी, षट्कोनी असे सर्व पक्ष व त्यांचे प्रवक्ते आले) हात जोडून कळकळीची विनंती करावीशी वाटते की, बाबांनो तुम्ही सर्वजण एकाच भारतमातेची लेकरे आहात. हा भारत घडवण्यात तुम्हा सर्वांचा कमी- जास्त प्रमाणात निश्चितच हातभार आहे. पण आपली वाणी व आपली भाषा यावर कृपया नियंत्रण ठेवा आणि रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मंगल बोला. Articals of Dr. Khadilkar
भारतीय संसदिय लोकशाहीत हा दिवस कधी उजाडेल याची हजारो सुजाण मतदार वाट पहात आहेत. याचे कृपया भान ठेवा आणि रामदास स्वामींनी सांगितलेला मंत्र ‘सर्वांमुखी मंगल बोलवावे’ वाणीत ठेवा ही सर्व राजकीय व्यक्तींना, पक्षांना व कार्यकर्त्यांना हात जोडून सर्व सुज्ञ मतदारांची नम्र विनंती. Articals of Dr. Khadilkar
टीप : या लेखात दिलेल्या नेत्यांच्या नावाव्यतिरिक्त अनेक नेत्यांची नावे घेता येतील, पण लेखाच्या विस्तार भयास्तव काहीच नावे घेतली आहेत.