यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई-जिल्हा केंद्र रत्नागिरी संस्थेत
गुहागर, ता. 30 : खासदार शरदचंद्र पवार साहेब अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई-जिल्हा केंद्र रत्नागिरीच्या युवा समन्वय पदी साहिल आरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेचे कार्याध्यक्षा खासदार सौ. सुप्रियाताई सुळे आहेत तर चिपळूणचे आमदार मा. श्री.शेखरजी निकम जिल्हा केंद्र रत्नागिरीचे अध्यक्ष आहेत व अभिजित खानविलकर हे सचिव आहेत. Arekar was selected as Youth Coordinator

साहिल आरेकर हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची आणि त्यांच्या संस्थात्मक कामाच्या अनुभवाची दखल घेऊन आमदार श्री. शेखरजी निकम यांनी श्री. साहिल आरेकर यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, जिल्हा केंद्र रत्नागिरी संस्थेच्या कामासाठी शिफारस करून त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई च्या रत्नागिरी जिल्हा केंद्राच्या युवा समन्वय पदी निवड केली आहे. आमदार निकम यांचे निकटवर्तीय अशी श्री.साहिल आरेकर यांची ओळख आहे. Arekar was selected as Youth Coordinator
श्री.साहिल आरेकर यांना कुटुंबातच सामाजिक राजकीय वारसा लाभला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, व गुहागर चे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर साहेब यांचे ते नातू आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर चे जेष्ठ नेते श्री. पद्माकर आरेकर यांचे ते पुतणे आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई संस्थेचे अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. तर खासदार सौ. सुप्रियाताई सुळे कार्याध्यक्ष आहे तसेच चिपळूणचे आमदार मा. श्री.शेखरजी निकम सर या संस्थेचे जिल्हा केंद्र रत्नागिरीचे अध्यक्ष आहेत व अभिजित खानविलकर हे सचिव आहेत. श्री.साहिल आरेकर यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Arekar was selected as Youth Coordinator

