• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भंडारी समाजाच्या वतीने आरेकर यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
October 21, 2022
in Ratnagiri
18 0
0
Arekar felicitated on behalf of Bhandari community
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचा  गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सकाळ समूहाचा बेस्ट चेअरमन आणि भंडारी एकीकरण समितीच्या वतीने भंडारी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. Arekar felicitated on behalf of Bhandari community

गुहागर तालुक्यातील चिखली हे मुळ गांव असणाऱ्या प्रभाकर आरेकर यांनी बी. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर 1971 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला सुरवात केली.  35 वर्ष इतक्या प्रदिर्घ कालावधीत प्रभाकर आरेकर यांनी नोकरीबरोबरच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्थेचे आठ वर्ष संचालक म्हणून काम केले. तर किसान स्टाफ सोसायटीचे ते अध्यक्ष होते. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या निमित्ताने त्यांना सहकार क्षेत्रातील अनेक चांगल्या वाईट घटना  जवळून अनुभवता आल्या. नोकरीच्या कालखंडातच सहकार क्षेत्रातील डिप्लोमा (जीडीसी ॲण्ड ए) त्यांनी पूर्ण केला. Arekar felicitated on behalf of Bhandari community

नोकरीत असतानाच सहकार क्षेत्राला बळ मिळेल असे काहीतरी वेगळं करुन दाखवावं  असे विचार त्यांना स्वस्थ बसु देत नव्हते. ही इच्छा त्यांनी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेत काम करणाऱ्या मित्रांना बोलून दाखवली. त्यातूनच 2002 मध्ये पतसंस्थेचा जन्म झाला. 13 जून 2002 रोजी चिपळूणमध्ये श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. केवळ 200 चौ. फुटाच्या भेंडी नाका येथील मुख्य कार्यालयातून संस्थेच्या कामकाजाला सुरवात केली. अल्पावधीत त्यांच्या मेहनतीला यश आले. अवघ्या अडीच वर्षात समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेने चिपळूण शहराबाहेर उमरोली येथे आपली पहीली शाखा क्रियन्वित केली. संस्थेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांमध्ये ठेवीच्या सुरक्षिततेबाबत विश्र्वास निर्माण केल्याने ठेवींमध्ये सातत्याने वाढु लागली. पारदर्शक व्यवहार आणि व्यावसायिकता जपत श्री समर्थ भंडारी प्रगती करु लागली. Arekar felicitated on behalf of Bhandari community

या सत्कार कार्यक्रमासाठी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक संस्थेचे व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. भरत शेटे, सेक्रेटरी श्री. निलेश मोरे, श्री. तुषार सुर्वे, श्री. दीपक शिरधनकर, श्री. मुरलीधर बागकर आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल श्री. आरेकर यांचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. Arekar felicitated on behalf of Bhandari community

Tags: Arekar felicitated on behalf of Bhandari communityGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.