रत्नागिरी, ता. 14 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी (Industrial Training Institute (Girls) Ratnagiri) येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्थेच्या विकास आराखडा नूसार नव्याने चालू होणाऱ्या इलेक्टिशियन ट्रेड करिता बांधकाम करण्याच्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आर्किटेक्ट नेमावयाचा आहे. Architect Recruitment at Ratnagiri

तरी इच्छुक रजिस्टर्ड र्किटेक्ट यांनी शैक्षणिक व अनुभवाच्या नुसार संस्थेच्या पत्त्यावर शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाज वेळेत संस्थेच्या पत्त्यावर दि. 23 जुन रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज हस्त देय सादर करावे. पोस्टाने अथवा ईमेल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची), रत्नागिरी यांनी केले आहे. Architect Recruitment at Ratnagiri
