गुहागर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी
गुहागर, ता. 27 : अमरावती येथे दि. 18 ते 22 एप्रिल 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कु. अर्चिता लवू सुर्वे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. ती श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर मधील इ. बारावी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. Archita Surve 3rd in State Level Sports Competition

कु. अर्चिता सुर्वे हिने मिळवलेल्या यशासाठी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक व शालेय समिती चे अध्यक्ष श्री. दिपकजी कनगुटकर साहेब यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे सर क्रीडा शिक्षिका सौ. हळदणकर मॅडम व सहाय्यक शिक्षक श्री गंगावणे सर उपस्थित होते. शाळेतील सर्व कर्मचारी वृंदांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. Archita Surve 3rd in State Level Sports Competition
