• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये तालुकास्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा

by Mayuresh Patnakar
July 18, 2026
in Guhagar
81 1
0
Archery Championship Competition in Guhagar
159
SHARES
453
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : गुहागर तालुका तिरंदाजी (आर्चरी) असोसिएशन, गुहागर आणि यशवंत स्पोर्ट्स आर्चरी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिल्हा निवड चाचणी म्हणूनही घेण्यात येणार असून, रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी शृंगारतळी येथील ओंकार मंगल कार्यालय हॉल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे स्पर्धा पार पडणार आहे. Archery Championship Competition in Guhagar

या स्पर्धेत तालुक्यातील विविध आर्चरी खेळाडू सहभागी होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. Archery Championship Competition in Guhagar

धनुर्विद्या खेळाला चालना देणे, ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. आयोजकांनी सर्व खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. “एकाग्रता, ध्येय, शिस्त आणि विजय” हा संदेश देत स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. Archery Championship Competition in Guhagar

Tags: Archery Championship Competition in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.