• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी अपुर्वा बारगोडे

by Ganesh Dhanawade
July 29, 2024
in Guhagar
247 2
0
Apurva Bargode as BJP Women President

अपुर्वा बारगोडे

485
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या उच्चशिक्षीत श्रीम. अपुर्वा बारगोडे यांची एकमताने माजी आमदार आणि गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.विनय नातू यांनी नियुक्ती घोषित केली आहे. तर नुकत्याच झालेल्या तालुका कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी बारगोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. Apurva Bargode as BJP Women President

गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या रिक्त असणाऱ्या अध्यक्षपदी डॉ. विनय नातू यांनी दूरदृष्टीने अपुर्वा बारगोडे यांची नेमणूक केलेली आहे. बारगुडे यांचे माहेर गुहागर तालुक्यातील खोडदे तर सासर हे वेळंब नालेवाडीतील आहे. मात्र त्यांचा अनेक वर्षाचा रहिवास हा व्यवसायाच्या निमित्ताने गुजरात मध्ये होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा विशेष पगडा आहे. त्यांचे पती कै. अनंत बारगोडे यांची भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाकरता वाहून घेण्याची असणारी इच्छा त्या आज पुर्ण करत आहेत. मुलगी डॉक्टर तर मुलगा नोकरीच्या निमित्ताने परदेशात असतो. त्यांचे शिक्षण एलएलबी पर्यंत पुर्ण झालेले आहे. कौटुंबिक आघाडीवर सर्व समाधानाने असताना भारतीय जनता पार्टीच्या कामकाजामध्ये वाहून घेण्याची तीव्र इच्छा असल्याने डॉ. विनय नातू यांनी त्यांच्याकडे गुहागर तालुका महिला मोर्चाची जबाबदारी दिली आहे. नातूसाहेबांनी दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन शत् प्रतिशत भाजपा करण्याच्या दृष्टीने पार पडणार असल्याचे यावेळी बारगोडे यांनी सांगितले. Apurva Bargode as BJP Women President         

या निवडीचे गुहागर तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत असून या निवडीबद्दल महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य निलम गोंधळी, माजी जि.प. सभापती स्मिता धामणस्कर, जिल्हा उपाध्यक्ष नम्रता निमुणकर, माजी सभापती दीप्ती असगोलकर, माजी पंचायत समिती सदस्य धनश्री मांजरेकर, माजी तालुका अध्यक्ष श्रद्धा घाडे, वैशाली मावळणकर, ज्योती परचुरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. Apurva Bargode as BJP Women President

Tags: Apurva Bargode as BJP Women PresidentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.