रत्नागिरी, ता. 14 : महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक संकेतांक २०२५०४२११८१८३६५२२९ असा आहे. Approval for two-wheeler taxi aggregator service
बाईक-टॅक्सी ॲग्रीगेटर धोरणामध्ये समाविष्ट बाबी
अॅग्रीगेटर करिता पात्रता –
बाईक- टॅक्सीच्या परवानगीकरिता किमान ५० दुचाकी असणाऱ्या पात्र अर्जदारास/घटकास संपूर्ण राज्याकरिता राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडून एकच परवाना देण्यात येईल. बाईक – टॅक्सी करिता देण्यात येणाऱ्या परवान्याची वैधता ५ वर्षे राहील. मोटार वाहन नियम १९८९ अन्वये दुचाकी करिता फिटनेस प्रमाणपत्र, वैध परवाना, वाहन विमा, असणे बंधनकारक राहील. सर्व दुचाकी-टॅक्सी पिवळ्या रंगात रंगवल्या जाव्यात आणि त्यावर बाईक-टॅक्सी असे लिहणे, दुचाकी-टॅक्सीवर सेवा प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहणे, आवश्यक राहील. Approval for two-wheeler taxi aggregator service


दुचाकी-टॅक्सींना उत्सर्जन मानकांचे पालक करणे आवश्यक राहील. दुचाकी-टॅक्सी अंतर्गत अर्ज करणा-या समुच्चयकांच्या दुचाकी या १००% इलेक्ट्रिक दुचाकी असाव्यात. दुचाकी चालकाकडे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ३ मधील तरतुदीनुसार विहित परवाना आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४ मधील तरतुदीनुसार बॅज असावा. Approval for two-wheeler taxi aggregator service
चालकाचे वय २० वर्षापेक्षा कमी आणि ५० वर्षापेक्षा जास्त नसावे. चालकास दरदिवशी दुचाकी चालविण्याकरिता ८ तासाची मर्यादा असावी. सेवा प्रदात्याने सर्व दुचाकी चालकांना प्रशिक्षण द्यावे. दुचाकी चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात यावी. तसेच, दुचाकी चालकाने मोटार वाहन नियमांतर्गत विहित वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक राहील. काही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवून ते ५० टक्के करण्याची जबाबदारी परवानाधारकाची राहील. दुचाकी टॅक्सी करिता परवाना धारकाने उभारण्याबाबतच्या पायाभूत सुविधा – समर्पित दुचाकी- टॅक्सी स्थानक, चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण दर्शवणे आवश्यक राहील. इलेक्ट्रिक- दुचाकींकरिता पुरेसे चार्जिंग स्टेशन्स उभारणे आणि परवाना धारकाकडे पुरेसे वाहनतळ उपलब्ध असणे बंधनकारक राहील. Approval for two-wheeler taxi aggregator service


सुरक्षितता
दुचाकी चालक केवळ एका प्रवाशाला घेऊन जाईल. १२ वर्षाखालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाईक टॅक्सींना प्रवाशी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसविण्यात यावे. पावसाळी हंगामामध्ये चालक आणि प्रवाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अच्छादन उभारण्यात यावे. जीपीएस ट्रॅकिंग, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक आणि प्रवाशी यांकरिता शिरस्त्राण बंधणकारक असेल. दुचाकी चालक आणि प्रवाशी यांच्याकरिता अपघात आणि मृत्यू या दोन्हींकरिताचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करुन देणे बंधनकारक असेल. Approval for two-wheeler taxi aggregator service
अंतर व दर
प्रति फेरी करिता जास्तीत जास्त १५ कि.मी. अंतराची मर्यादा असेल. दुचाकी-टॅक्सीच्या दराचे नियंत्रण संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात येईल. अॅप / संकेतस्थळ :- दुचाकी टॅक्सी ॲग्रीगेटरकडे सुरक्षा मानकांची पुर्तता करणारे अॅप / संकेतस्थळ असणे आवश्यक राहील. तसेच दुचाकी-टॅक्सी सेवा या अॅप / संकेतस्थळ याद्वारे चालविण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी सांगड घालणे- वाहतूक मार्गांचे सुसुत्रीकरण करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी दुचाकी-टॅक्सी अंतर्भूत करण्यात येईल. तसेच, शहरांमधील ज्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही अशा भागांमध्ये काही प्रमाणात दुचाकी-टॅक्सी सेवा उपलब्ध करुन द्यावी लागेल. परिवहनेतर दुचाकींच्या बाईक पुलींगकरीता परवानगी देण्यात येत आहे. याकरीता पुलिंग करु इच्छिणाऱ्या परिवहनेतर दुचाकी चालकांना शहरांतर्गत प्रतिदिवशी ४ फेऱ्या आणि शहराबाहेर प्रतिदिवशी २ फे-या अनुज्ञेय असतील. याकरीता चालकास द्याव्या लागणाऱ्या प्रत्यक्ष रकमेची फक्त आकारणी करता येईल. बाईक पुलींग दरम्यान समुच्चयकांना नफा कमावता येणार नाही. दुचाकी या देखील इलेक्ट्रीक असाव्यात. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अॅग्रीगेटर्स गाईडलाईन्स-२०२४ चा मसूदा प्रसिद्ध केला आहे. याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानुषंगाने आवश्यक ते बदल /सुधारणा तसेच प्रतिदिवस तात्पुरता परवाना याबाबत सक्षम स्तरावर मान्यता घेवून करण्यात येईल. तसेच, दुचाकी टॅक्सीबाबतच्या नियमावलीमध्ये अंशतः किंवा किरकोळ सुधारणा करण्याकरीता परिवहन आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरु करण्याबाबतची नियमावली स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येईल. Approval for two-wheeler taxi aggregator service