• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटीच्या रत्नागिरी विभागात शिकाऊ उमेदवारी भरती

by Mayuresh Patnakar
September 11, 2026
in Ratnagiri
21 0
0
गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत विविध १२ कार्यशाळा व्यवसायातील अर्हताधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी एकूण ४३६ जागा भरल्या जाणार असून, पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन रत्नागिरी राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे. Apprenticeship Recruitment in ST Ratnagiri Division

दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक

इच्छुक उमेदवारांनी [https://apprenticeshipindia.gov.in/](https://apprenticeshipindia.gov.in/) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यासोबतच, आवश्यक त्या सर्व मूळ व साक्षांकित कागदपत्रांसह नमुना अर्ज रत्नागिरी येथील राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. Apprenticeship Recruitment in ST Ratnagiri Division

प्रशिक्षणाचा कालावधी व जागांचा तपशील

प्रस्तुत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा राहील. विविध १२ व्यवसायांतर्गत भरल्या जाणाऱ्या ४३६ जागांचा तपशील खालीलप्रमाणे:
 * यांत्रिक डिझेल: ११० जागा, * यांत्रिक मोटारगाडी: ११० जागा, * साठा जोडारी: ५० जागा, * पत्राकारागीर: ५० जागा, * वीजतंत्री: ४० जागा, * सांधाता: २० जागा, * रंगारी: २० जागा, * कातारी: १० जागा, * यंत्र कारागीर: १० जागा, * रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग: १० जागा, * शिवणकाम: ०४ जागा, * सुतार: ०२ जागा Apprenticeship Recruitment in ST Ratnagiri Division

सदर भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, प्रक्रियेत अंशतः बदल करणे अथवा पदांच्या संख्येत वाढ किंवा घट करणे याबाबतचे सर्व अंतिम अधिकार विभाग नियंत्रक, रा.प. रत्नागिरी विभाग यांच्याकडे राखीव राहतील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. Apprenticeship Recruitment in ST Ratnagiri Division

Tags: Apprenticeship Recruitment in ST Ratnagiri DivisionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.