गुहागर, ता. 30 : तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशिल गणपत अवेरे यांची गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेत संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी सर्वानुमते नेमणुक करण्यात आली. ॲड. सुशिल अवेरे हे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. व विविध उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. Appointment of Sushil Avere as Advisor

ॲड. सुशील गणपत अवेरे यांचे शिक्षण M.Com. LL.B. G.D.C&A असून सन २०१८ साली वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते LL.M करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते गुहागर तालुका पत्रकार संघ सभासद होते. त्यांनी पत्रकार म्हणून जनसेवेला सुरुवात केली. चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया या नॉर्वे देशाच्या सामाजिक संस्थामध्ये दाभोळ येथे तीन वर्ष ”सोशल वर्कर ” म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य सहकार खात्याच्या व धर्मादाय आयुक्तालय यांचे मार्फत लेखापरीक्षक म्हणून तीन वर्ष काम केले. महाराष्ट्र राज्य सहकार खात्याच्या प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून तीन वर्ष काम केले. महाराष्ट्र राज्य सहकार खात्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून एक वर्ष काम केले आहे. Appointment of Sushil Avere as Advisor
सद्या ते अधिकृत जीएसटी सल्लागार व कर तसेच आर्थिक नियोजन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. गुहागर तालुका वकील संघ सचिव पदी, अखिल भारतीय ग्राहक मंच गुहागर तालुका कोषाध्यक्ष पदी, रत्नागिरी कर सल्लागार असोसिएशन सदस्यत्व, महाराष्ट्र राज्य जीएसटी प्रॉक्टेशनर असोसिएशन सदस्यत्व, शासकीय, निमशासकीय, शाळा व महाविद्यालयामध्ये गेस्ट लेक्टचरर म्हणून कर व आर्थिक नियोजन विषयक व्याखाने देत आहेत. Appointment of Sushil Avere as Advisor

