जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ. अनिल जोशी
गुहागर, ता. 16 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. तालुक्यातील ड्याशिंग नेतृत्व आणि आरपीआय (ए) चे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुरेश भिकाजी सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गुहागर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Appointment of Suresh Sawant as NCP taluk president


राज्यात शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेले आहे. राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदार, खासदार आणि राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गटाला अधिक पसंती दिली आहे. गुहागर तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटासोबत राहिले आहेत. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ड्याशिंग नेतृत्व असलेले आणि मुळात त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला काँग्रेस पक्षामधून सुरुवात केलेले सुरेश सावंत यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे. Appointment of Suresh Sawant as NCP taluk president


सुरेश सावंत हे तालुक्यातील क्रियाशील कार्यकर्ते आहेत. नागरिकांच्या अनेक समस्यांवर त्यांनी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. शिवाय प्रशासनावर त्यांची चांगली पक्कड आहे. श्री. सावंत हे १२ डिसेंबर १९८६ ते नोव्हेंबर १९९७ अशी ११ वर्ष आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषविले. १५ वर्ष सोसायटी चेअरमन पद, १० वर्ष रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्डवर संचालक, त्यातील एक वर्ष अध्यक्ष पद, गुहागर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून २०१२ ते १७ या कालावधीत सदस्य असतानाच २०१४ मध्ये उपसभापती म्हणून सव्वा वर्ष काम पाहीले. त्याचवेळेस सभापती श्री. राजेश बेंडल यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने श्री. सावंत यांच्याकडे प्रभारी सभापतीचा कार्यभार आला होता. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुकाध्यक्ष पद भूषविले. आणि पुन्हा आरपीआय (ए) पक्षात प्रवेश करून जिल्हाध्यक्ष पदी काम सुरू केले. Appointment of Suresh Sawant as NCP taluk president


या निवडीनंतर बोलताना श्री. सावंत म्हणाले की, आपण मुळातच काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणुन काम करताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. Appointment of Suresh Sawant as NCP taluk president