पक्ष संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण
गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागरच्या नवीन पदाधिकारी मनसे अध्यक्ष राजसाहेबांच्या आदेशाने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, गुहागर ता.संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शृंगारतळी येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर या नवीन पदाधिकाऱ्याना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. Appointment of new office bearers of MNS Taluka Guhagar
यावेळी तालुका सचिव श्रीराम विचारे, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन जोशी, महेश घाणेकर, शृंगारतळी जि.प. गट उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, असगोली जि.प.गट उपतालुकाध्यक्ष अमित गंगाराम खेडेकर, कोंडकारूळ जि.प.गट उपतालुकाध्यक्ष सुरेश गोपाळ शिर्के, कोडकारुळ गण विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, मळण गण विभाग अध्यक्ष प्रफुल्ल साळवी, शीर पं.स.गण विभाग अध्यक्ष नितीन कारकर, शृंगारतळी प.स.गण विभाग तुषार शिरकर, असगोली प. स. गण विभाग अध्यक्ष संजोग देवकर, पडवे पं.स.गण विभाग विभाग अध्यक्ष उमेश पांचाळ, तळवली गण विभाग अध्यक्ष अजय सकपाळ, अंजनवेल गण उपविभाग अध्यक्ष सुहास चोगले, शाखाध्यक्ष विघ्नेश भायनाक (पालशेत), यश पोळेकर (कोंडकारुळ), सोहम जामसुतकर (जामसुत) ओंकार धामणस्कर (मळण), निलेश गमरे (चिखली), मनोहर धोपट (रानवी) वैभव आंबेरकर (वेलदूर), साहिल खडपे (अंजनवेल), प्रणय घडवले (आरे) सुमित पवार ( आबलोली), सागर ठोंबरे (शीर), सचिन निकम (दोडवली) अनिरुद्ध भुवड (निगुंडळ), उपशाखा अध्यक्ष अमर नाटूस्कर (कोंडकारुळ) दिपक सोलकर (रानवी), अनिकेत भुवड (निगुडळ), गट अध्यक्ष सुशिल अडुरकर (कोंडकारूळ), राकेश पालशेतकर (आबलोली), गट अध्यक्ष सहिल भाताडे (निगुडळ), यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये सर्व जुन्या कार्यकर्त्यांना बढती देण्यात आली आहे. Appointment of new office bearers of MNS Taluka Guhagar
कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर यांनी सांगितले की, मनसे कार्यकत्यांनी पक्ष वाढविण्यासाठी गावोगावी काम केले पाहीजे, संघटना मजबुत झाली तर अनेक लोकप्रतिनिधी निवडुन येऊ शकतील, संघटना मजबुत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजे आहे. उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, सर्वांनी मतभेद विसरून पक्षवाढीसाठी प्रयत्न करू या, राजसाहेबांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहीजे. Appointment of new office bearers of MNS Taluka Guhagar
जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राजकारण व समाजकारणासाठी कार्यकर्त्यांनी जनतेचा पहिल्यांदा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. राजकारणामध्ये क्रांती निर्माण करण्याची गरज आहे, सध्या राज्यकर्त्याना गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्याशी काही देणे घेणे नाही, या सर्वांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहीले पाहीजे, झोपडीत राहणारा शाखाध्यक्ष आमदार झाला पाहीजे ही भावना राजसाहेबांची आहे, कार्यकत्यांनी पक्षशिस्त, पक्षनिष्ठा पाळली पाहिजे. पुढे येणारे दिवस मनसे पक्षासाठी चांगले आहेत. ग्रामीण भागात पक्षसंघटना अधिक मजबूत करायची असून नाका तेथे शाखा निर्माण करायच्या आहेत. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी काम करायचे आहे. सभेचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी मानले. Appointment of new office bearers of MNS Taluka Guhagar