रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कऱ्हाडे ब्राह्मण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संघाकडे विहीत नमुन्यात १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. Appeal by Karhade Brahmin Sangh


कर्हाडे ब्राह्मण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी गुणवत्ता पारितोषिके दिली जातात. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त व इयत्ता बारावी मध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी संघाकडे विहीत नमुन्यात १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करावेत.त्याचप्रमाणे कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील इयत्ता आठवीपासून पुढील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठीही गरजू विद्यार्थ्यांनी कर्हाडे ब्राह्मण संघात उपलब्ध असणाऱ्या विहीत नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. Appeal by Karhade Brahmin Sangh


यासाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघ, शेरेनाका, झाडगाव, रत्नागिरी (दूरध्वनी ०२३५२-२२४५७९) येथे संपर्क साधून १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज द्यावेत, असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे. Appeal by Karhade Brahmin Sangh