कला विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय रंगभरण व हँड रायटिंग स्पर्धा
गुहागर, ता. 04 : कला विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय रंगभरण व हँड रायटिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल जानवळेची अन्वी विदेश दाभोळकर या विद्यार्थीनीने ग्रुप सी विभागात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल कला विकास संस्थेतर्फे सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. Anvi of Janwale School is second in the state
त्याचबरोबर लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूलमधील इ. पहिली मधील कु. ओवी संदीप मांडवकर व कु रिद्धी बाळासाहेब लबडे, इ. दुसरी मधील कु. अधिरा उमेश खैर व कु. श्रेया सचिन चव्हाण, इ. तिसरी मधील कु अनुश्री मनोज सकपाळ व कुमारी शुभ्र प्रताप चव्हाण, इ. पाचवी मधील कु. स्वरा सूर्यकांत सुर्जन व कु. श्रवण अशोक साळवी इ. सहावी मधील कु. श्रिया तेजस आंबेकर, इ. सातवी मधील कु. अंशिका रामअचल चौबे, इ.नववी मधील कु. ऋग्वेद रवींद्र गुडेकर, सिनियर केजी ग्रुप विभागामध्ये कु. मायरा अजय नार्वेकर व उत्तेजनार्थ पारितोषिक ज्युनिअर विभागात कु. रिदाँय युवराज भोसले व कु. आयुष लुकमान तडवी या 14 मुलांनी स्पेशल आर्ट मेरिट ची ट्रॉफी जिंकली आहे. Anvi of Janwale School is second in the state
या सर्व मुलांचे संस्थेतर्फे व स्कूल तर्फे गौरव करण्यात आला. तसेच स्कूलला कला विकास संस्थेतर्फे ऍक्टिव्ह स्कूलचा अवॉर्ड देण्यात आला. या सर्व मुलांना सहकार्य व मार्गदर्शन करणारे श्री हेमंत गणपत शिरकर यांना कलामित्र अवॉर्ड व रोख रुपये पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. Anvi of Janwale School is second in the state