रत्नागिरी, ता. 29 : १४ वर्षांखालील वयोगटातील जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कु. अनुज संतोष कारकर याने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. नागपूर येथे १९ व २० ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यांमध्ये अनुजने प्रभावी फलंदाजी आणि दमदार गोलंदाजी करत आपल्या खेळाची छाप पाडली. Anuj Karakar selected in Maharashtra team
जिल्हास्तरीय स्पर्धेतील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत अनुजची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. मेहनत, जिद्द आणि क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाच्या जोरावर त्याने हे यश मिळविले आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून गोवा येथे राष्ट्रीय स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाकडून खेळण्याची संधी अनुजला मिळाली आहे. Anuj Karakar selected in Maharashtra team
अनुजच्या या निवडीमुळे त्याच्या कुटुंबीयांसह प्रशिक्षक, मित्रपरिवार तसेच रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. Anuj Karakar selected in Maharashtra team
