गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्रा. शाळा उमराठ नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात विविध कला गुणदर्शन कार्यक्रम गुरूवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात शाळेतील एकूण २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. Annual Sneh Samelan at Umratha School


या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर आणि नामदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व गावातील सर्व वाडी अध्यक्ष वाडी प्रमुख यांचे शाळेचे मुख्याध्यापक नाटेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच जनार्दन आंबेकर व नामदेव पवार यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा दिल्या. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तव आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर दीप नृत्य, बालगीते, कोळीगीते, लावणी, गोंधळ, रेकॉर्ड डान्स, नाटिका असे अनेक विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अशा अनेकविध कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. Annual Sneh Samelan at Umratha School


या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे नाटिका – मास्तरांची शाळा. सहभागी कलाकारांना प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात हार्मोनियमची साथ मुख्याध्यापक नाटेकर यांनी दिली, तर तबल्याची साथ अनिल अवेरे यांनी दिली. स्टेज, लायटिंग आणि साऊंड व्यवस्था योगेश कदम आणि मित्र मंडळी यांनी उत्तम केली. नेपथ्य व वेशभूषा अनिल अवेरे, किरण ढोणे आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी पालक वर्गाच्या सहकार्याने अतिशय उत्तम केली होती. यावेळी शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थींचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला. Annual Sneh Samelan at Umratha School


सदर वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत कदम, सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण तज्ञ संदीप गोरीवले, सर्व वाडी अध्यक्ष प्रतिनिधी, सर्व पालक वर्ग, शाळा उमराठ नंबर ३ मुख्याध्यापिका स्नेहल गोरिवले मॅडम, सैतवडेकर सर, शाळा व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य, पालक शिक्षक संघामधील सर्व सदस्य, त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे सहकार्य दिल्याबद्दल आभार मानून समारोप केला. Annual Sneh Samelan at Umratha School



