गुहागर, ता. 25 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजचे (Regal College Shringartali) वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमामध्ये रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली. Annual Reunion at Regal College
यावेळी निरनिराळ्या ठिकाणी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी लावणी, नमन, कोळीनृत्य, फनी डान्स, शक्ती तुरा, कव्वाली, गायन अशा विविध कार्यक्रम सादर केले. सांस्कृतिक विभागाचे विभागप्रमुख प्रा. श्री.शाहरुख चोगले, प्रा. श्रीम. ईशा दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी कु.वेदिका वाडावे यांनी उत्तमरीत्या कार्यक्रमाची धुरा सांभाळली. Annual Reunion at Regal College

सरपंच तेलगडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आज व्यावसायिक शिक्षण हि काळाची गरज आहे. गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी रिगल कॉलेजने व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. श्री. आसीम साल्हे यांनी रिगल कॉलेजमध्ये मुलांना शिक्षणाबरोबर रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचे कौशल्य आहे. या कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील चांगला व्यावसायिक म्हणून घडतो, असे गौरोद्गार त्यांनी काढले. विराज महाडिक यांनी रिगल कॉलेजचे विद्यार्थी खूप हुशार व मेहनती आहेत, असे ते म्हणाले. Annual Reunion at Regal College

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटपन्हाळे सरपंच श्री. विजय तेलगडे, उपसरपंच श्री. आसीम साल्हे, लगून हॉटेलचे मॅनेजर श्री. विराज महाडिक तसेच मोठ्या प्रमाणात पालकवर्ग, विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. सौ. रेश्मा मोरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेमध्ये वार्षिक अहवाल वाचन व रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक कोर्सेसची माहिती दिली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Annual Reunion at Regal College
