वार्षिक स्नेह मेळावा निमित्त विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका पेन्शनर संघटनेचा पेन्शनर डे निमित्त वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पेन्शनर संघटने अध्यक्ष श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शनिवार दि. 17/12/22 रोजी सकाळी 11 वा. श्री. देव व्याडेश्वर देवस्थानचे सभागहात संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. Annual Meeting of Pensioners Association
मेळाव्याची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात येणार आहे, त्यानंतर दिवंगत सेवानिवत्तांना श्रध्दांजली, स्वागत/ प्रास्ताविक, मागिल वर्षाचे इतिवत्त वाचन व मंजुरी घेणे, वय वर्ष 75 पूर्ण केलेल्या पेन्शनर सभासदांचा सत्कार, उपस्थित सेवानिवत्त सभासदांचे मनोगत, अध्यक्षिय भाषण, समारोप अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यकारी सदस्य व सभासदांनी उपस्थित रहावे, अशी विनंती गुहागर तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष नं. तु. पाटील, सचिव बा. गो. पवार, खजिनदार म. दि. मेस्त्री, उपाध्यक्ष म. बा. जाधव व कार्यकारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संघटनेचा वार्षिक अहवाल मेळाव्याच्या ठिकाणी देण्यात येईल. अशी सूचना देण्यात आली आहे. Annual Meeting of Pensioners Association

