गुहागर, ता. 22 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रधान कार्यालय सभागृह आबलोली येथे पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. Annual General Meeting of Kunbi Credit Union

या वार्षिक सभेत २१ व्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास मंजूरी देणे, ताळेबंद व नफा – तोटा पत्रक व अंतर्गत लेखापरीक्षकाचा अहवाल स्विकृत करणे, नफा विभागणीस मान्यता देणे, वैद्यानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, अंतर्गत हिशोब तपासणीस नेमणे व त्याचा मेहनताना ठरवीणे, २२ व्या वार्षिक सभेस हजर राहू न शकलेल्या सभासदांची गैरहजेरी माफ करणे, संचालक मंडळ, सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाच्या तपशीलाची नोंद घेणे, तसेच ज्या सभासदांना सूचना करावयाच्या असतील किंवा अहवाल सालातील माहिती हवी असेल तर त्यांनी आपल्या सूचना अगर प्रश्न तीन दिवस अगोदर सभेपूर्वी सभेच्या कार्यालयात लेखी आणून देणे, अध्यक्षांच्या परवानगीने येणा-या विषयांवर चर्चा होणार आहे. Annual General Meeting of Kunbi Credit Union

सभेसाठी पतसंस्थेच्या सभासदांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन कुणबी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष श्री. तुकाराम निवाते, संचालक श्री.पांडूरंग पाते, श्री.प्रदिप बेंडल, श्री.महादेव वणे, श्री.संदेश कदम, श्री.वैभव आदवडे, श्री.उदय गोरीवले, अमोल वाघे, श्रीमती.वनिता डिंगणकर, सौ.श्रावणी पागडे, श्री.अनंत पागडे, श्री.संदिप पाष्टे, कार्यलक्षी संचालक श्री.अनिल घाणेकर यांनी केले आहे. Annual General Meeting of Kunbi Credit Union
