गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रत्नज्योती क्रीडांगण येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘अतुल्य भारत’ या थीमच्या आधारे आपल्या नृत्यांमधून संपूर्ण राज्यांचे सादरीकरण केले. Annual function at Bal Bharti Public School
उपस्थितांचे सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांनी केले. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. मातृशक्ती वंदनेच्या उत्तम नृत्य आविष्काराने स्कूलच्या विद्यार्थींनीनी सर्वांचे स्वागत केले. प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी सन २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षामधील ‘बेस्ट ऑल राऊंडर’ प्री-स्कूल ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा आणि ९०% च्या वर मिळवलेल्या १० वी तील विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ व गुणगौरव सोहळा सर्वासमक्ष करण्यात आला. Annual function at Bal Bharti Public School
अतुल्य भारत’ या संकल्पनेतून साकार होत जाणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्री- स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून भारत मातेचे स्वागत केले. प्री- प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी – गोवा तर १ ली च्या विद्यार्थ्यांनी – जम्मू-काश्मीर व उत्तराखंड, २ रीच्या विद्यार्थ्यांनी – छत्तीसगड तर ३ रीच्या विद्यार्थ्यांनी – राजस्थान व गुजरात, ४ थीच्या विद्यार्थ्यांनी – पंजाब व हरियाणा तर ५ वीच्या विद्यार्थ्यांनी – वेस्ट बंगाल, ६ वीच्या विद्यार्थ्यांनी – आसाम तर ७ वीच्या विद्यार्थ्यांनी – केरळ व कर्नाटक, ८ वीच्या विद्यार्थ्यांनी – महाराष्ट्र आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांनी – आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यांचे आपल्या नृत्यातून प्रतिनिधित्व केले. विविधतेत एकता हा संदेश विद्यार्थ्यांनी शेवटच्या प्रतिकृतीतून सर्वांना दिला. Annual function at Bal Bharti Public School
वार्षिक स्नेहसंमेलनासाठी बाल भारती पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापक श्रीमती रेखा शर्मा, आरजीपीपीएलचे जनरल मॅनेजर संजय कुमार अगरवाल, श्रीम. सीमा अगरवाल, कोंकण एलएनजी एचआर एजीएम श्री. एस.पी. रेड्डी, श्रीमती रेड्डी,आरजीपीपीएल हेड एचआर डॉ. जॉन फिलीप, तहसिलदार श्रीम. प्रतिभा वराळे, विद्याधर पंडित, अंतर्यामी दास, श्री. विकास सिंह, श्री. एस.डी. कुरूप, श्री. डी.बी. ठाकूर, श्री. दिनेश कुरूप, वरिष्ठ व्यवस्थापक श्री.आशिष पांडेय, अंकिता पांडेय, श्री. बाबल जॉफरी, अमित शर्मा, श्री. कुमार स्वामी बत्तुला आदी उपस्थित होते. Annual function at Bal Bharti Public School
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजीत चटर्जी, नृत्य शिक्षक प्रतिक मजुमदार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी, सेक्युरेटी पथक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. Annual function at Bal Bharti Public School