संस्थेच्या अडचणी पालकमंत्री मा.ना. सामंत यांच्या मार्फत सोडविणार; श्री. कणगुटकर
गुहागर, ता. 27 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 21वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा, सत्कार समारंभ, साहित्य वाटप, महिलांसाठी हळदी कुंकू, विविध गुणदर्शन कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख श्री. दिपकजी कणगुटकर उपस्थित होते. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सल्लागार कै.अण्णासाहेब शिरगावकर व संचालक कै. सुनील पाडावे यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी व्यवसाय करण्यासाठी दिव्यंगाना शितपेटीचे वाटप करण्यात आले. यामध्ये 1)रवींद्र जांभारकर, नवानगर 2) सिद्धेश भोसले, आरेगाव 3) सुहानि आंबेरकर, बुधल 4) गंगाजी भोसले, नवानगर तसेच गरजू दिव्यंगाना कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये 1) श्री.अनिल कुंभार, जामसुत-कुबड्या, 2) श्री. प्रकाश कांबळे, दोडवली-कुबड्या, 3)सखाराम घाडे, वेलंब – कुबड्या, 4) श्री.संजय मिसाल, आंजर्ले ता. दापोली-व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute
त्याचप्रमाणे दिव्यांग संस्थेला व दिव्यांगांना वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दात्यांचा दिव्यांग संस्थेमार्फत मानाचा असा दिव्यांग मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मान पत्र व भेटवस्तू असे होते. यामध्ये चिपळूणचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोकजी भुस्कुटे साहेब व गुहागर तालुक्यातील वेळब गावचे पोलीस पाटील श्री.स्वप्नील बरगोडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दिव्यंगावर मात करून स्वतः चा, कुटुंबाचा विकास करणाऱ्या दिव्यांगांचा स्वयंसिध्द पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये आंजर्ले गावचे सरपंच श्री. मंगेश महाडिक व्यवसाय कुकूटपालन व काजू प्रोसेसिंग युनिट तसेच लांजा तालुका अपंग संस्थेचे अध्यक्ष श्री. गौतम सावंत, व्यवसाय सर्जिकल साहित्य बनविणे. यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वयंसिध्द पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute
प्रस्तावनामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री.उदय रावणंग यांनी संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील संस्थेच्या असलेल्या गरजा व समस्या उपस्थित मान्यवरांसमोर मांडल्या. संस्थेच्या वतीने त्यांनी दीपक कनगुटकर यांना पालकमंत्री महोदयांसमोर पुढील बाबींची मागणी करण्याची विनती केली. त्यामध्ये 1) दिव्यांगांसाठी अपंग संकुल बांधण्यासाठी CSR फंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. 2) जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये दिव्यंगांसाठी असणाऱ्या 5% सेस निधीतील काही रक्कम दिव्यांग सल्लामसलत समुपदेश करण्यासाठी दरवर्षी मिळावी. 3) दिव्यांगासाठी असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवर या संस्थेतील एका सदस्याची नेमणूक व्हावी. याबाबी मांडण्यात आल्या. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री.दीपक कनगुटकर साहेब यांनी संस्थेचे कार्य पाहून सर्वांचे अभिनंदन केले. गेली 21, वर्ष हि संस्था कोणतेही शासकीय अनुदान न घेता अविरतपणे कार्यरत असून त्यांचे काम समाजापुढे आदर्श आहे. संस्थेच्या असणाऱ्या सर्व अडचणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री.उदयजी सामंत यांच्यामार्फत सोडविण्यासाठी मी विशेष प्रयत्न करीन असे सांगितले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute
संस्थेच्या निधी संकलन उपक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुहागर तालुक्यातील माध्यमिक शाळांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक सौं. सानिका रांजाणे, सौ.पूनम रावणंग, कोमल शिंदे, सुनील जोशी, विजय पाटील, संगम रावणंग, श्री. खोट सर, सौं. मंगल अनगुडे यांनी विशेष प्रयत्न केले.
अध्यक्ष भाषणामध्ये श्री. विनायक ओक सर यांनी संस्था करत असलेल्या विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे मत वव्यक्त केले. त्यांनी 21व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. श्री.सुशील अवेरे यांनी केले. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute
या कार्यक्रमासाठी गुहागर हायसकूलचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी आडकर, संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. विनायक ओक, डॉ. अनिल जोशी, श्री. प्रकाश बापट, केंद्र प्रमुख श्री. श्रीकांत वेल्हाळ, सर्पमित्र प्रा.ज्ञानेश्वर म्हात्रे, पालशेत हायसकूलचे माजी मुख्याध्यापक श्री.मनोज जोगळेकर, संस्थेचे सल्लागार श्री.रवींद्र कुळये, श्री .किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकजी भुस्कुटे, पत्रकार श्री. बाबासाहेब राशीनकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.अरुण भुवड, वरवेली गावचे ग्रामसेवक श्री. भुवड साहेब, वरवेलीचे पोस्टमास्टर श्री. सोलकर, गुहागर हायसकूलचे श्री.विलास कोरके, श्री.दिलीप मोहिते, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड. श्री.सुशील अवेरे, पत्रकार श्री.गणेश किर्वे, सल्लागार श्री.रत्नाकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री.उदय रावणंग, सरचिटणीस श्री.सुनील रांजाणे, खजिनदार श्री.सुनील मुकनाक, संचालक श्री.अनिल जोशी आदी मान्यवर व मोठ्या संख्येने दिव्यांग सभासद उपस्थित होते. Anniversary of Taluka Disability Rehabilitation Institute