• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २५ रोजी वर्धापन दिन

by Ganesh Dhanawade
March 23, 2023
in Guhagar
261 2
0
Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute
512
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ मार्च 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेमार्फत दिव्यंगत्वावर मात करून स्वतः चा, कुटुंबाचा व समाजाचा विकास करणाऱ्या दोन दिव्यांग बांधवाना स्वयंसिध्द पुरस्काराने गौरविले जाणार आहे. Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute
Apang-Punarvasan-Sanstha-gate

गुहागर तालुक्यात दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी स्थापन केलेली सेवाभावी आणि नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेत सर्व प्रकारचे १४०० हुन अधिक दिव्यांग सभासद आहेत. संस्थेचे सर्व सदस्य व कार्यकारी पदाधिकारी दिव्यांग असून संस्थेने गेल्या २० वर्षांमध्ये दिव्यागांसाठी वेगवेगळे यशस्वी उपक्रम राबविले आहेत व राबवित आहे. तसेच संस्थेने गेल्या २० वर्षाचे ऑडिट रिपोर्ट व अहवालही वेळेत सादर केलेले आहेत. संस्थेला कोणत्याही प्रकारचे शासकीय अथवा निमशासकीय अनुदान मिळत नाही. संस्था लोकसहभागातून तसेच सल्लागार, हितचिंतक यांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी उपयुक्त असे विविध उपक्रम राबवित आहे. Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २५ मार्च रोजी संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. १०.३० वाजता सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी शासकीय योजना व सवलती यांचे मार्गदर्शन, कृत्रिम साहित्य वाटप, व्यवसायाच्या दृष्टीने शितपेट्यांचे वाटप आणि स्वयंसिध्द व दिव्यांग मित्र पुरस्काराचे वितरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते २. ३० सर्वांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ ते ४.३० महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी श्री. किरण तथा भैया सामंत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सहदेव बेटकर आदी उपस्थित राहणार आहेत. Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

संस्थेमार्फत दिला जाणारा दिव्यांग मित्र पुरस्कार चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करणारे अशोक भुस्कुटे, गुहागर तालुक्यातील वेळंब गावचे पोलीस पाटील श्री. स्वप्नील तुकाराम बरगोडे यांची तर दिव्यंगत्वावर मात करून स्वतः चा, कुटुंबाचा व समाजाचा विकास करणाऱ्या दोन दिव्यांग बांधवाना स्वयंसिध्द पुरस्काराने गौरविले जाणार आहे. त्यासाठी श्री. गौतम सावंत (लांजा), श्री. मंगेश महाडिक (आंजर्ले) या मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

तरी सर्व दिव्यांग बंधू – भगिनी, हितचिंतक, सल्लागार, देणगीदार व महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग व सरचिटणीस श्री. सुनील रांजाणे यांनी केले आहे. Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

Tags: Anniversary of Taluka Apang Rehabilitation InstituteGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share205SendTweet128
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.