गुहागर, ता. 22 : नालासोपारा पूर्व नूतन विद्यालय येथे शिव स्वराज प्रतिष्ठानचा ५ वा वर्धापन दिन व दिनदर्शिका २०२३ लोकार्पण सोहळा मोठा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवर मिलिंदजी पाटील, दिनेश शिंदें, तुकाराम जी पास्टे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. Anniversary of Shiv Swaraj Pratishthan
यावेळी शिव स्वराज प्रतिष्ठाणच्या वतीने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा देण्यात आला. व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिष्ठाणच्या वतीने शिव स्वराज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ श्री मिलींद पाटील यांना देण्यात आला. कला गौरव पुरस्कार २०२२ श्री कृष्णा येद्रे याना तर लेखक / कवी पुरस्कार श्री निलेशजी उजाळ यांना देण्यात आला. त्याचबरोबर घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा २०२२ बक्षीस वितरण सोहळा करण्यात आला. प्रथम पारितोषिक श्री प्रतिक किशोर गावडे, द्वितीय श्री गणेश टेमकर, तृतीय श्री संकेत येद्रे, सोबत सहभाग श्री सचिन कुळये/श्री अंकुश निवाते तवसाळ आदी सर्वांना पुरस्कार देण्यात आला. Anniversary of Shiv Swaraj Pratishthan

यावेळी प्रमुख वक्ते व मान्यवर श्री मिलींद पाटील, डॉ विजय विर, तुकाराम जी पाष्टे, अँड दिनेश शिंदे, बाळकृष्ण म्हस्कर, अनिल अवेरे, दिपक मांडवकर (पत्रकार), दिनेश नवरत, मंगेश घडवले, सुरेश मोहिते, सुनिल रेवाळे, संतोष रेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक शशांक गावणंग यांनी सादर केली. तर सुत्रसंचालन एकनाथ डिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिव स्वराज प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्री. विलासजी सुवारे/खजिनदार श्री रमेश आंबेकर यांनी सर्व मान्यवरांचे व पुरस्कर्ते यांचे आभार मानले. Anniversary of Shiv Swaraj Pratishthan

