काजरघाटी येथे व्यसनमुक्त ग्रामस्थांचा सत्कार
रत्नागिरी, ता. 20 : शहराजवळील महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोद्धाराचावर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि रात्रीच्या बहुरंगी नमनाने रंगत आणली. यावेळी व्यसनमुक्त झालेल्या तिघांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. Anniversary of Mahalakshmi Temple
सकाळी विधीवत पूजा, अभिषेक, होमहवन झाले. त्यानंतर सत्यनारायण पूजा झाली. सायंकाळी स्थानिकांचे भजने झाली. त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होता. रात्री गुणगौरव समारंभात व्यसनमुक्त झालेल्या हरिश्चंद्र कांबळे, दत्ताराम गोताड, महेश चव्हाण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री सदगुरू बाळ सत्यधारी महाराज आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यापूर्वी या दोन्ही मान्यवरांचा देवस्थान आणि ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थानचे सर्व विश्वस्त, उत्सव समिती सभासद, ग्रामस्थ बंधू-भगिनी आणि श्री महालक्ष्मी मित्रमंडळाचे सर्व सदस्य, तरुण कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. गावातील महिलांनी या कार्यक्रमातील महाप्रसादाची व्यवस्था खंबीरपणे पेलली. रात्री गावातीलच तरुण व हौशी नाट्यमंडळाने सादर केलेला बहुरंगी नमन बहारदार झाले. या मंडळाचा हा पहिलाच प्रयत्न असूनही अतिशय सुरेश सादरीकरण करून या कलाकारांनी ग्रामस्थांची शाबासकी मिळवली. Anniversary of Mahalakshmi Temple
या कार्यक्रमादरम्यान, श्री. कुलकर्णी यांनी महालक्ष्मी देवस्थान आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. देवीचा वार्षिक उत्सव मनोरंजनासाठी साजरा न करता त्यातून सामाजिक बांधिलकी जपून आणि समाजप्रबोधनाचा उद्देश साध्य होत आहे. व्यसनमुक्त झालेल्या ग्रामस्थांबरोबरच देवस्थानने त्यांचा केलेला सत्कार अतिशय कौतुकास्पद उपक्रम असल्याचे सांगितले. गावातील आणखी कोणी व्यसन करत असेल तर त्यांनीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन व्यसनमुक्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. Anniversary of Mahalakshmi Temple