संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : बौध्दजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिद्धार्थ कला वैभव मंडळ यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव तसेच लुंबीनी बुद्ध विहाराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Anniversary of Buddha Vihara in Asore

या महोत्सवानिमित्त असोरे येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी धम्म संस्कार पूजापाठ, लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा तसेच महिलांचे विविध कार्यक्रम झाले. त्रिशरण पंचशीलेने पहिल्या दिवसाची सांगता झाली. Anniversary of Buddha Vihara in Asore
दुसऱ्या दिवशी सकाळी धम्म ध्वज व पक्ष ध्वज रोहण करून भन्ते विमल बोधी यांच्या हस्ते पूजापाठ आणि धम्म देसना देण्यात आली. सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बामसेफचे सिद्धार्थ जाधव, काशिनाथ गो. सुर्वे आणि के. जी. सुर्वे उपस्थित होते. याच जाहीर कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेली कोकणातील पहिली बौध्द युवती स्वाती सुर्वे- कांबळे (आयडीएएस) हीचा सत्कार करण्यात आला. सौ. स्वाती सुर्वे या बौध्दजन सेवा संघ (रजि.) असोरे, मुंबई या शाखेचे ज्येष्ठ सभासद अशोक सुर्वे (माजी सैनिक -एअर फोर्स), तसेच माजी अधिकारी (मुंबई पोलीस दल) यांच्या द्वितीय कन्या आहेत. तसेच काही मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. Anniversary of Buddha Vihara in Asore

तिसऱ्या दिवशी गावातील लहानमुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण करून या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई भावकीचे सचिव सुभाष सुर्वे आणि गावभावकीचे सचिव प्रशांत सुर्वे यांनी केले. Anniversary of Buddha Vihara in Asore
