बाबासाहेबांना अपेक्षीत असलेल्या प्रथा आणि गाथा अंगिकारुया; बबनराव कदम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतानाच मुलांनी शिक्षणा बरोबरच धम्माचे ज्ञान ग्रहण केले पाहिजे. शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो. आपले पुर्वज हे नागवंशी असल्याने या बुध्द विहाराला नागवंशी बुध्द विहार असे नाव देण्यात आले आहे. तसेच आंबेरे गावातील मंडळींनी स्वकष्टाने, मेहनतीने, हे भव्यदिव्य बुध्द विहार ऊभारले आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. या बुध्द विहारात रोज बुध्द पुजापाठ ,बुध्द वंदना, धम्माचे सांस्कृतीक केंद्र झाले पाहिजे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेल्या बुध्द धम्मातील प्रथा आणि गाथा आपण अंगीकारल्या पाहिजेत असे स्पष्ट मत भारतीय बुध्द सासन सभा मुंबई या धम्म संघटननेचे जेष्ठ मार्गदर्शक आणि बुध्द धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम यांनी व्यक्त केले. Anniversary celebration of Vihara at Amberekhurd

ते आंबेरेखुर्द येथील भगवान गौतम बुध्द यांची २५६७ वी जयंती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती व नागवंशी बुध्द विहाराचा चौथा वर्धापन दिन अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुध्द सासन सभा (रजि.) शाखा तालुका गुहागर, रयत लोक संघटन, भारतीय बुध्द सासन सभा, शाखा आंबेरे समस्त रणपीसे, सावंत भावकी, आंबेरे(मुंबई), माता रमाबाई आंबेडकर महिला मंडळ(मुंबई) यांचे संयुक्त विद्यमाने श्री. अनंतराव मोहिते यांचे अध्यक्षतेखाली नुकताच साजरा करण्यात आला. Anniversary celebration of Vihara at Amberekhurd

यावेळी मान्यवरांचे हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पुजन, दिप्रज्वलीत करुन बुध्द पुजापाठाने या जयंती महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर स्वप्निल सुर्वे यांच्या शांतीदुताच्या वैभव शाली या गाण्याने या जाहिर सभेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सुभाष कदम, शैलेश मोहिते, भारतीय बुध्द सासन सभा या धम्म संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि जाहिर सभेचे अध्यक्ष अनंतराव मोहिते यांनीही मार्गदर्शन केले. Anniversary celebration of Vihara at Amberekhurd
यावेळी जाहिर सभेला मार्गदर्शन करताना बबनराव कदम म्हणाले की, धम्म संघटना कीतीही असल्यातरी धम्माची आचार संहिता आणि धम्म संस्कार हे एकच असले पाहिजेत. भारतीय बुध्द सासन सभा या धम्म संघटनेचे लोक, गावे, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नंतर दिवंगत बौध्द नेते अॅड. बी.सी. कांबळे तथा बापुसाहेब कांबळे, दिवंगत नेते व्हि.एस.कदम यांच्या पाठीशी ठाम राहून पक्ष आणि धम्म संघटनेचे काम अविरतपणे चालू आहे. डॉ. बाबासाहेबांची हि धम्म व राजकीय चळवळ माझ्या रक्तात शेवटचा थेंब असे पर्यंत अविरत चालूच ठेवणार असा ठाम निर्धारही बबनराव कदम यांनी व्यक्त केला. Anniversary celebration of Vihara at Amberekhurd

यावेळी भारतीय बुध्द सासन सभा मुंबई या धम्म संघटनेचे सेक्रेटरी एस.एल.सुर्वे म्हणाले की, बुध्द धम्म आणि पाली भाषा हे अतुट नातं आहे पाली भाषा जरी पाली असली तरी तीची लीपी वेगळी आहे पाली भाषेचे संशोधन झाले तेव्हा कोणालाही ती अवगत नव्हती सम्राट अशोकाने जेवढे शिलालेख लिहिले ते धम्म लिपीत म्हणजे पाली भाषेत लिहिले म्हणून आपली मुले पदवीधर होतात, उच्च शिक्षित होतात अधिकारी होतात. त्यांनी पाली भाषा अवगत करावी मग आपल्याला बुध्दाचे धम्म तत्वज्ञान, इतिहास , स्थापत्य कला वास्तू यांचा अभ्यास समजतो आणि विज्ञान समजते सम्राट अशोक यांना पाली भाषेत सम्राट असोक असे म्हटले जाते तर भगवान बुध्दांना पाली भाषेत खतीय म्हटले जाते. खतीय म्हणजे शेतकरी म्हटले आहे. संस्कृतही भाषा बौध्द लोकांची आहे. बौध्द भिक्कूंनी ती तयार केली आहे. बुध्द या भुमीत सापडला आहे म्हणजे बुध्दाचे पुतळे आणि शिलालेख या भूमीत सापडलेत नागवंशी हे बौध्द होते आणि बाबासाहेब सुध्दा बोधिसत्व होते अशी मौलिक माहिती एस.एल.सुर्वे यांनी दिली. Anniversary celebration of Vihara at Amberekhurd

यावेळी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी अनंतराव मोहिते, बबनराव कदम, एस.एल.सुर्वे, बाळकृष्ण जाधव, सुभाष कदम, शैलेश मोहिते, मधुकर यादव, पांडूरंग पाते, महादेव रणपिसे, अर्जुन सुर्वे, सरपंच रविंद्र अवेरे, पोलिस पाटिल श्रीरंग डिंगणकर, निर्मला रणपिसे, रुपाली रणपिसे, साक्षी यादव, अशोक रुके, गौतम यादव, शिवराम यादव, माजी सरपंच अपर्णा रणपिसे, प्रभाकर सुर्वे, आदि. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल मोहिते, मंगेश कदम यांनी केले. Anniversary celebration of Vihara at Amberekhurd
