गुहागर वरचापाट येथे दि. 30 एप्रिल ते 1 मे रोजी विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 24 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीचा 16 वा वर्धापन सोहळा दि. 30 एप्रिल ते 1 मे असा दोन दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अखिल जगताच्या कल्याणासाठी, सृष्टी संवर्धनासाठी शतचंडी चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली. Anniversary celebration of Shri Durga Devi
वर्धापन दिनानिमित्त दररोज स. 6 ते 6.30 श्रींची महापुजा, दु. 12 वा. श्रींचा महानैवेद्य व प्रसाद, सायं. 6.30 ते 7 वा. श्रींची सांजपूजा, सायं. 7.15 ते 8 वा. श्रींचा गोंधळ, आरती व मंत्रपुष्पांजली असे कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. Anniversary celebration of Shri Durga Devi
श्री दुर्गादेवीच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त शनिवार दि. 29 रोजी स. 8 वा. शतचंडी पुण्यावाचन व देवता स्थापना, ग्रहयज्ञ. रविवार दि. 30 रोजी स. 6.30 वा. श्रींचा महापूजा, स. 7.30 वा. सप्तशती पाठवाचन, दु. 1 वा. बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम अंतर्गत गरीब होतकरू मुलींना शैक्षणिक मदत, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ. निलमताई गोंधळी महीला आघाडी (भाजपा) प्रदेश उपाध्यक्षा, व प्रमुख वक्त्या माधवीताई नाईक, प्रदेश महामंत्री (भाजपा) उपस्थित राहणार आहेत. सायं. 4 वा. श्रींचे ग्रामदैवतेच्या भेटीसाठी प्रस्थान व श्रींचा ग्रामदैवत भेट सोहळा, सायं. 6.30 वा. श्रींची पाद्यपुजा, औक्षण, गोंधळ, आरती, मंत्र, पुष्पांजली व प्रसाद रात्रौ. 10 वा. स्वामी एन्टरटेनमेंट प्रस्तुत स्वरोत्सव भावगीत, भक्तीगीत, नाट्यसंगीताची सुरेल मैफल रंगणार आहे. यासाठी गायीका, इंडियन आयडॉल फेमच्या कु. ज्ञानेश्वरी गाडगे त्यांना हार्मोनियम साठी कु. कार्तिकी गाडगे, तबला वादनासाठी अभिजीत बारटक्के तर सुरसंचालन, कु. ईषा देशपांडे साथ देणार आहेत. Anniversary celebration of Shri Durga Devi
सोमवार दि. 1 रोजी स. 11.30 वा. शतचंडी पूणर्आहूती, स्वाहाकार, आरती. दु. 12.30 ते 2 वा. महाप्रसाद, रात्री 9.30 वा. प्रविण मराठे प्रोडक्शन, गोवा लेखक व दिग्दर्शक प्रविण मराठे यांचे दगडू सावधआन एक नृत्य नाटक सादर करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी केले आहे. Anniversary celebration of Shri Durga Devi