• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दलित मित्र कै. अण्णा शिरगावकर यांची शोकसभा संपन्न

by Ganesh Dhanawade
October 17, 2022
in Guhagar
17 0
0
Anna Shirgaonkar's condolence meeting concluded

इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांना श्रद्धांजली वाहताना अपंग पुनर्वसन संस्थेचे पदाधिकारी.

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेच्या वतीने संस्थेच्या वरवेली चिरेखाण फाटा येथील कार्यालयात अपंग मित्र व दलित मित्र कै. अनंत उर्फ अण्णा धोंडू शिरगावकर यांची शोकसभा पार पडली. शोकसभेची सुरुवात कै. अण्णाच्या प्रतिमेस त्यांचे नातु श्री. गौरव यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिट उभे राहून कै. अण्णांना श्रद्धांजली वाहिली. Anna Shirgaonkar’s condolence meeting concluded

या कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधाकर कांबळे यांनी केले. त्यावेळी त्यांनी संस्थेचे संस्थापक सल्लागार अण्णा शिरगावकर हे दलित मित्र, नामवंत इतिहास संशोधक, पुरातन वस्तु संग्राहक, दिव्यांग मित्र व गोरगरीब जनतेचे कैवारी होते. ते ९३ वर्षांचे होते. त्यांनी अनेक संस्था स्थापन करुन त्या यशस्वीपणे चालविल्या. त्यांची सामाजिक कार्याबरोबरच राजकीय क्षेत्रातही चांगली ओळख होती, असे कांबळे यांनी सांगितले. Anna Shirgaonkar’s condolence meeting concluded

संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी अण्णानी केलेल्या कामाची माहिती दिली. अपंग संस्थेचा आत्मा म्हणजे अण्णा शिरगावकर असे गौरोदगार काढले. त्यांच्या जाण्याने अपंग संस्था पोरकी झाली आहे. त्यांनी दिलेली शिकवण व घालून दिलेले नियम यांची संस्थेच्या वतीने जोपासना करुन संस्थेचे काम जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. Anna Shirgaonkar’s condolence meeting concluded

शोकसभेचे आयोजन करण्यासाठी गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संगम रावणंग, नीलम देवळे, सरिता आंबेकर, मंगेश रावणंग, महेश जोशी, कोमल शिंदे, भरत घेवडे आदिनी विशेष प्रयत्न केले. यावेळी संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कुलचे उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सल्लागार श्री. किरण शिंदे, प्रभूनाथ देवळेकर, कै. अण्णा यांचे नातू श्री. गौरव शिरगांवकर, संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग, सरचिटणीस श्री. सुनील रांजाणे, खजिनदार श्री. सुनील मुकनाक, जेष्ट सल्लागार श्री. रत्नाकर पाटील, श्री. नामदेव रावणंग, सौ. रश्मि पाटील, श्री. संतोष कदम, श्री. संतोष घूमे आदिंसह अपंग संस्थेचे सभासद उपस्थित होते. Anna Shirgaonkar’s condolence meeting concluded

Tags: Anna Shirgaonkar's condolence meeting concludedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.