रविवार दि. १६ रोजी गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्था वरवेली
गुहागर, ता. 14 : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेचे संस्थापक सल्लागार, दलित मित्र कै. अण्णासाहेब शिरगावकर यांचे दि. ११ रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा येथे होणार आहे. Anna Shirgaonkar’s condolence meeting

कै. अण्णासाहेब शिरगावकर हे नामवंत इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक म्हणून प्रसिध्द होते. गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्था चालविणे, सांभाळणे व ती नावारूपाला आणणे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांची ही शिकवण व कार्य अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी अपंग पूनर्वसन संस्था म्हणून सदैव प्रयत्न करण्यासाठी तयार आहे. Anna Shirgaonkar’s condolence meeting

तरी त्यांच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संस्थेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सभासद, सल्लागार, हितचिंतक व अण्णा शिरगावकर यांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. Anna Shirgaonkar’s condolence meetingइतिहास संशोधक अण्णा शिरगावकर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिंक करा.

इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिंक करा.
