गुहागर, ता. 24 : देवपाठ स्मशानभूमीत लाकडे खूप जाडी असून कमीही आहेत. तसेच तेथील लाकडं ठेवण्यात येणाऱ्या इमारतीची शटरही गंजली असल्यामुळे कायम उघडी असतात. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत मध्ये जाऊन भेट दिली. Angry citizens visited the Nagar Panchayat

देवपाठ स्मशानभूमीत गेले काही महिने जाडी लाकडं आहेत. अनेक वेळा नागरिकांनी नगर पंचायत मध्ये तक्रार करून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यावेळी नागरिकांनी तिथूनच दूरध्वनी करुन असलेली वस्तुस्थिती पाहण्यासाठी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याला पाठवण्याची साहेबांजवळ मागणी केली. त्याप्रमाणे नगरपंचायतचे कर्मचारी येऊन तेथिल वस्तुस्थितीची पाहणी केली. तिथे लाकडं फार कमी असून अत्यंत जाडी आहेत. ती लाकडं एका माणसाला उचलताही येत नाहीत. तसेच या इमारतीला दोन्ही साईडला शटर आहेत. परंतु ती शटर पूर्णपणे सडली असल्यामुळे उघडीच असतात. अशा परिस्थितीत आत कोणी वन्य जनावर जावून राहू शकतील. याचीही भीती नागरिकांमध्ये आहे. Angry citizens visited the Nagar Panchayat

नागरिकांनी ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांना दाखवल्यानंतर तसेच स्मशानभूमीतून थेट नगरपंचायत मध्ये जाऊन या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार बदलावा व इमारतीला शटर लावावी अशी मागणी केली . तसेच नगरपंचायत टेंडर मध्ये विहित नमुन्याप्रमाणे असलेली लाकडे लवकरात लवकर स्मशानभूमीत टाकावी, अशी मागणी केली. वरचापाट बाग येथीलही स्मशानभूमीत गेले दोन महिने लाकडे नसुन सतत मागणी करत असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. Angry citizens visited the Nagar Panchayat
