सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र
गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदार गुहागर यांना दिले आहे. Anganwadi workers’ letter to Tehsildar
गेली दोन वर्ष आम्हाला शासनामध्ये सामावून घ्यावे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार व इतर भत्ते मिळावेत म्हणून आंदोलन करत आहोत. आमची ही मागणी पूर्ण झालेली नाही. परंतू तेच शासन आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे समजून धान्य बंद करण्याचे आदेश देत आहे. हे योग्य नाही. या आदेशांची अंमलबजावणी करण्यापूर्वी आम्हा सर्वांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घ्यावे. शासनाप्रमाणे पगार द्यावा. नंतर वरील आदेशांची कार्यवाही करावी. अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभा शाखा गुहागरच्या अध्यक्षा सारिका हळदणकर यांनी केली आहे. Anganwadi workers’ letter to Tehsildar


गुहागर तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शन धारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाव्दारे शासकीय अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांचा लाभ त्वरीत थांबवावा. असे आदेश तहसिलदार सौ.वराळे यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला दिले होते. तसेच अशा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना तहसिल कार्यालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. Anganwadi workers’ letter to Tehsildar


या संदर्भात प्रथमच अंगणवाडी सेविकांच्या संस्थेने संघटीत होवून आवाज उठविला. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र या संघटनेच्या गुहागर शाखेने तहसीलदार गुहागर यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती करताना विधवा, परित्यक्त्या, अपंग, दारिद्रय रेषेखालील महिलांना प्राधान्य दिले जाते. या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करतात. हे मानधनही शासनाकडून वेळेवर मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे त्यांना धान्याची गरज आहे. त्याचप्रमाणे 2011 पासून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे 2011 पासून झालेला नाही. गेली 10 ते 15 वर्षे ए.बी.ल. धारकांना 1 किलो धान्यही मिळत नाही. त्यामुळे रास्त दराच्या धान्य दुकानातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे धान्य मिळत रहावे. Anganwadi workers’ letter to Tehsildar


हे निवेदन देताना सपना विचारे, संध्या आंब्रे, वैभवी विचारे, मयुरी रांजाणे, श्वेता दवेकर आणि शुभांगी वणे या अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. Anganwadi workers’ letter to Tehsildar