गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारीनंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू होईल असे जाहीर केले आहे. यावेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे. Anganwadi Servants Recruitment

केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयातर्फे मिशन पोषण 2.0, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य हे तीन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना महामारीनंतर आजतागायत अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यावेळी वेगवेगळ्या कारणांनी अनेक अंगणवाड्यांमधील पदे रिक्त आहेत. त्यामुळे मिशन पोषण 2.0, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या तीन योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत आहेत. ही त्रुटी लक्षात घेवून पहिल्या टप्प्यात 20 हजार अंगणवाडी सेविकांची पद भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. Anganwadi Servants Recruitment
मिशन पोषण 2.0 या उपक्रमामध्ये केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर हे ॲप विकसीत केले आहे. या ॲपवर दररोजच्या पोषण आहाराची माहिती टाकणे बंधनकारक आहे. सदर ॲप इंग्रजीत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभुमीवर अंगणवाडी सेविका पद भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. 10 वी उत्तीर्ण ऐवजी किमान 12 वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे. या संबंधिचा शासन निर्णय प्रसिध्द झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. Anganwadi Servants Recruitment
विश्र्वसनीय माहितीनुसार 26 जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरु होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणे, उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन त्याबाबत हरक्ती मागविणे यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करुन पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. Anganwadi Servants Recruitment
