रिपब्लिकन (आठवले ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
आबलोली, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राव्दारे दिला आहे. १ ते २० पटसंख्येच्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेवून व्यक्ती विकासासोबत देश हिताचा विचार करावा, असे या पत्रात श्री. पवार यांनी म्हटले आहे. Anant Pawar’s letter to Chief Minister

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी करिता, महाराष्ट्र शासनाने १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची कार्यवाही सुरु असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी सारखा अतिग्रामीण, अतिदुर्गम, डोंगराळ, विरळ लोकसंख्येच्या भागामध्ये १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या जिल्ह्यामध्ये १३७५ आहे. या शाळांच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च ही खूप मोठा आहे. रत्नागिरी सारख्या भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता, १ ते २० पटसंख्या असलेल्या काही शाळांच्या ३ ते ५ कि. मी. अंतराच्या परिसरामध्ये दुसरी शाळा उपलब्ध नाहीत. परंतु सदरच्या अंतरामध्ये घनदाट जंगल, नद्या नाले, हिंस्त्र प्राणी, डोंगराळ भाग, अशा अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. Anant Pawar’s letter to Chief Minister
या देशातील महामानवानी असंख्य संघर्षातून गोर-गरीब, वंचित, दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण नेऊन पोहचवले. परिणामी या देशातील बहुजनास शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. आणि माणसासारखे जीवन जगता आले. आपल्या सरकारने १ ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण भागातील तसेच वंचित, दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षणापासून कायमचे वंचित राहतील. इतिहासाचा अभ्यास करता पूर्वी सामाजिक अडसारांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून दुर्लक्षित राहत होते. आणि आता शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. Anant Pawar’s letter to Chief Minister
