गुहागर, ता. 02 : वाढलेले मतदानाचा टक्का बघता जवळजवळ ४.५ लाख मते NOTA तुन घटली आणि हिंदुत्वाच्या कामी आली. २०१९ साली १.३४% लोकांनी नोटा हा पर्याय निवडला होता जो २०२४ मध्ये फक्त ०.७२% लोकांनी निवडला. २०१९ मध्ये वंचित, बसप, मनसे अश्या छोट्या छोट्या पक्षांना ८. ३ % मतदान झाले होते यावेळी मात्र ते घटून ४.८% इतके झाले. याचाच अर्थ हिंदूंनी अत्यंत विचारपूर्वक मतदान केले आहे. मतदारांनी मराठी गुजराती, सवर्ण दलित, मराठा, माळी असे न करता सकल हिंदू म्हणून मतदान केले. या सगळ्या मतदारांनी हिंदुत्वासाठी मतदान केले असेच म्हणावे लागते आहे. Analysis of Women’s Voting
२०२४ च्या लोकसभा निवडणुकी च्या पेक्षा ७० लाख मते हि या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जास्त आली आणि भाजपाची मतांची संख्या हि सुद्धा ३० लाखांनी वाढली. याचाच सरळ अर्थ असा निघतो कि, अतिरिक्त मतदान जे झाले त्यात भाजप ला मिळणाऱ्या मतांचा वाटा हा ४०% आहे जो सरासरी २६% च्या आसपास घुटमळतो. २०१९ च्या विधानसभेच्या तुलनेत यावेळी जवळजवळ १ करोड मतदान जास्त झाले आणि भाजप ला ४४ लाख मते २०१९ च्या तुलनेत अतिरिक्त मिळाली याचाच सरळ अर्थ असा निघतो कि २०१९ च्या तुलनेत जे अतिरिक्त मतदान जे झाले त्यात भाजपला मिळणाऱ्या मतांचा वाटा हा ४५% आहे. Analysis of Women’s Voting
महिलांचे वाढीव मतदान, महिलांचे मतदारांचा मतदानाचा टक्का हा 2019 मध्ये 59.26 % होता जो आता २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान 65.21 % पोहोचलला आहे, जवळ जवळ 52 लाख मतांची उल्लेखनीय वाढ हि आपल्याला दिसून येते जी आपल्याला हेच दर्शवते कि लाडकी बहीण योजना हि सर्व स्तरातील भगिनींना कमालीची भावली आणी विरोधकांनी कितीही टोमणे मारले तरी महिना अतिरिक्त १५०० रूपांचे मोल या महिलांना नक्कीच माहित आहे. Analysis of Women’s Voting
लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली आहे. अधिकाधिक महिला याचा लाभ उठवत आहेत. मध्यमवर्गीय समाज जो मतदान करण्यासाठी फारसा उत्सुक नसतो अश्या लोकांनी हिंदुत्वासाठी बाहेर पडून मतदान केले. नवे, तरुण मतदार secularism च्या मागे न लागता, शाश्वत आणि स्थिर विकासाच्या मुद्यावर पक्षाला सत्तास्थानावर बसवण्यासाठी मतदान करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. Analysis of Women’s Voting